शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या दुरवस्थेचा सलग घेतला दुसरा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:24 IST

शिव कॉलनीजवळ तरुण ठार : रात्री १० वाजेची घटना

जळगाव : चित्रा चौकात खड्ड्याने उद्योजक अनिल बोरोले यांचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री १० वाजता खराब साईडपट्ट्याने उज्ज्वल उर्फ पप्पू सोपान सोनवणे (२६, रा. सावखेडा बु.ता.जळगाव) या तरुणाचा बळी घेतला. खराब साईडपट्टीमुळे दुुचाकी घसरल्याने मागून आलेल्या वाहनाचे चाक उज्ज्वल याच्या डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शिवकॉलनी स्टॉपवर घडली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वल सोनवणे याच्या साडूचे वडील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यांच्या जेवणाचा डबा देण्यासाठी शहरात आला होता. हे काम आटोपल्यानंतर दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.टी.००४७) घरी जात असताना महामार्गावर शिवकॉलनी थांब्याजवळ साईडपट्टीवरुन दुुचाकी घसरली, त्यामुळे उज्ज्वल रस्त्याच्या कडेने फेकला गेला व त्याचवेळी पाळधीकडे भरधाव वेगाने जाणारे चारचाकी वाहन उज्ज्वल याच्या डोक्यावरुन गेल्याने तो जागेवरच गतप्राण झाला.मोबाईलवरुन पटली ओळखया अपघातानंतर मृत तरुणाला जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी लोकांनी अनेक वाहनांना थांबविण्यासाठी विनंती केली, कोणतेच वाहन मदतीसाठी थांबत नव्हते, त्यामुळे तब्बल अर्धा तास मृतदेह जागेवर पडून होता. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. शेवटी एका चारचाकी वाहनातून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान, घटनास्थळावर काही तरुणांनी उज्ज्वल याचा मोबाईल तपासला असता शेवटचा फोन सासऱ्यांना लागलेला होता. त्यावर संपर्क साधल्यावर उज्ज्वल याची ओळख पटली.एकुलता मुलगा... उज्ज्वल हा एकुलता मुलगा होता. त्याचे वडील सोपान कौतिक पाटील नायब तहसीलदार म्हणून निवृत्त झाले आहेत. आई कल्पना गृहीणी असून दोन बहिणी विवाहित आहेत. उज्ज्वल काही दिवसापूर्वी भाजी मार्केटमध्ये कामाला होता, मात्र सध्या ते कामही सोडलेले होते. सहा महिन्यापूर्वीच रावेर येथील कोमल या तरुणीशी त्याचा विवाह झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव