शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दुस-या दिवशी ७१ उमेदवारांनी दाखल केले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 20:54 IST

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी 

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : ग्रामपंचायत निवडणूकीसाठी जळगाव जिल्ह्यात गुरूवारी दुस-या दिवशी ७१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तहसील कार्यालयांच्या आवारात निवडणूकीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तसेच जात वैधता प्रमाणपत्राच्या पावतीसाठी देखिल इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची दिवसभरात चांगलीच धावपळ उडाली.जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याला सुरूवात झाली आहे. जळगाव तालुक्यासह जिल्हाभरातून गुरूवारी ७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सकाळी साडे नऊपासूनच इच्छूकांनी तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत निहाय टेबलावर जावून अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. जळगाव तालुक्यातून तीन अर्ज दाखल झाले आहे. त्यामध्ये ममुराबाद, आवार तसेच चिंचोली गावातून प्रत्येक एक अर्ज गुरूवारी दाखल झाला आहे.तालुकानिहाय दाखल अर्जांची संख्याजळगाव तालुका ३, जामनेर ५, धरणगाव २, एरंडोल २, पारोळा ३, भुसावळ ७, मुक्ताईनगर १, बोदवड १४, यावल ०, रावेर ८, अमळनेर ७, चोपडा ३, पाचोरा ६, भडगाव २ आणि चाळीसगाव ८ असे एकुण ७० उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.जात पडताळणी समितीचे कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणारग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती जोडणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांकडुन अर्ज दाखल होत आहे. उमेदवारांची गैरसोय होवू नये, याकरीता २५ ते २७ डिसेंबर या शासकीय सुटीच्या दिवशी सकाळी ९.४५ ते ६.१५ या कार्यालयीन वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथील कार्यालय उमेदवारांचे अर्ज स्वीकारणेसाठी नियमीत सुरु राहणार आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतJalgaonजळगाव