शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

जळगावात सलग दुसऱ्या २० मार्केट कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 12:21 IST

बाहेर गावाहून आलेले ग्राहक परतले माघारी

ठळक मुद्देरोजंदारी कर्मचारी बसून३० कोटींची उलाढाल ठप्प

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २२ - गाळेधारकांच्या बेमुदत बंदमुळे दुसºया दिवशी २० मार्केटमध्ये सर्वत्र शुकशुकाट पसरून बहुतांश ठिकाणी संचारबंदीचे स्वरुप आले होते. बंदमुळे जवळपास ३० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बंद दरम्यान अनेक ठिकाणी बुधवारी सकाळी गाळेधारक दुकानासमोर येऊन बसले होते तर काही ठिकाणी बैठे खेळ रगंले होते. दरम्यान, बंदमुळे बाहेरगावाहून आलेल्या ग्राहकांना माघारी परतावे लागले.गाळेधारकांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील २० मार्केटमध्ये पाहणी केली असता दुसºया दिवशीही सर्व मार्केटमध्ये कडकडीत बंद असल्याचे दिसून आले.भास्कर मार्केटमध्ये एक दुकान सुरूबंदमध्ये सर्व गाळेधारकांचा सहभाग असला तरी भास्कर मार्केट परिसरात टायपिंगचे एक दुकान सुरू असल्याचे दिसून आले.पूरक व्यवसायही बंदभास्करमार्केटमधील एक दुकान वगळता सर्व दुकाने बंद होत्या. या सोबतच गाळ््यांच्या समोर असलेले खाद्य पदार्थ, चहा यांच्या हातगाड्यादेखील बंद होत्या. त्यामुळे एरव्ही नेहमी रुग्णालयांमध्ये आलेल्या नातेवाईकांची असणारी गर्दीदेखील या परिसरात नव्हती.आंबेडकर मार्केटमध्ये शांतताडॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट परिसरातील व्यवसाय बंद असल्यामुळे व्यावसायिक हातावर हात धरून बसले होते. बंदमुळे या परिसरात शांतता पसरलेली होती.रोजंदारी कर्मचारी बसूनशहरातील या २० मार्केटमधील दुकानांवर काम करणारे रोजंदारी कर्मचारी संख्यादेखील मोठी आहे. बंदमुळे हजारो कर्मचारी हातावर हात ठेवून बसून होते. बंदचा कर्मचाºयांना मोठा फटका बसत असून अजून किती दिवस रिकामे रहावे लागते, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.बी.जे. मार्केटमध्ये रंगले बैठे खेळजुने बी.जे. मार्केट परिसरात फेरफटका मारला असता या ठिकाणी अनेक दुकांनांसमोर काही दुकानमालक येऊन बसले होते. अनेक जण तर बैठे खेळांमध्ये रंगले होते तर काही जण मोबाईलवर खेळत बसले होते. या सोबतच या ठिकाणी कृषी बी-बियाणे, औषधी घेण्यासाठी येणारे बाहेरगावचे शेतकरीदेखील येऊन थांबले होते.महात्मा फुले मार्केटसमोर लागल्या रसवंतीच्या गाड्यामहात्मा फुले मार्केटचे प्रवेशद्वार आजही बंद होते. मध्ये कोणाराही जाता येत नव्हते. मार्केटच्या समोर फळ विक्रेते तसेच उसाच्या रसाच्या गाड्या लागलेल्या होत्या. एरव्ही दररोज फुले मार्केटमध्ये रसवंतीवर येणाºयांची गर्दी असते, त्याचा फायदा या रसवंतीच्या गाडीवाल्यांना झाला.खरेदीदार परतले माघारीफुले मार्केटमध्ये खरेदीसाठी दररोज जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील खरेदीदार येत असतात. बुधवारीदेखील अनेक मंडळी येथे खरेदीसाठी आले. मात्र मार्केट बंद असल्यामुळे कोणताच माल येथे मिळू न शकल्याने खरेदीदारांना रिकाम्या हातीच माघारी परतावे लागले.सेंट्रल फुले मार्केटमधील हातगाड्या, टेबलही बंदसेंट्रल फुले मार्केटमध्येही सर्वत्र शांतता होती. आतमध्ये जाण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारावर हातगाड्या व दुचाकी लावण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे आतमध्ये कोणालाच प्रवेश दिला जात नव्हता. दुकानांसोबतच बाहेर लागणाºया हातगाड्या, टेबलदेखील आज येथे नव्हते.टॉवर चौकातही बंदटॉवर खाली असलेल्या सर्व दुकानादेखील बुधवारी बंद होत्या. या सोबतच या परिसरात लागणारे कंबरपट्टा (बेल्ट), व्हॉलेट (पाकीट) यांची दुकानेदेखील लागलेली नव्हती.महात्मा गांधी मार्केट परिसरात घोळक्याने उभेमहात्मा गांधी मार्केटमधील सर्व दुकाने बंद होती. या ठिकाणी पायºयांवर काही मंडळी येऊन बसलेली होती. दुकानांसमोर अनेक जण घोळका करून उभे होते.शाहू मार्केट, जुने शाहू मार्केट बंदशाहू मार्केट तसेच जुने शाहू मार्केट परिसरातही कडकडीत बंद पाळण्यात येऊन सर्व दुकाने बंद असल्याचे या ठिकाणी दिसून आले.३० कोटींची उलाढाल ठप्प२० गाळे धारकांच्या बंदमुळे बाहेर गावाहून आलेले ग्राहकही माघारी परतल्याने व्यवसाय ठप्प होऊन जवळपास ३० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. बंदच्या पहिला दिवशी जिल्हा व्यापारी महामंडळानेही दुपारी एक वाजेपर्यंत बंद पाळला. तसेच काही सुवर्ण व्यवसायिकांनीही बंद ठेवल्याने पहिल्या दिवशी उलाढाल ठप्प झाल्याचा आकडा जास्त वाढला होता. 

टॅग्स :JalgaonजळगावStrikeसंप