शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
2
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
3
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
4
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
5
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
6
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
7
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
8
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
9
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
10
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
11
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
12
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
13
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
14
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
15
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
16
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
17
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
18
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
19
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
20
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन; बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट
Daily Top 2Weekly Top 5

केळी नुकसानीवर हंगामी तीन पिकांचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 20:04 IST

पीक पद्धतीत बदल काळाची गरज । खेडगावचे भगवान पाटील यांनी जाणले बदलाचे फायदे

खेडगाव, ता.भडगाव : जिल्हा केळीसाठी प्रसिध्द असला तरी बदलत्या हवामानामुळे (वादळ, गारा, अती तापमान व थंडी) व व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे हे पिक घेणे म्हणजे आर्थिक संकट ओढुन घेण्याइतपत धोकादायक बनले आहे. यामुळेच खेडगाव येथील भगवान हरसिंग हिरे या शेतकऱ्यांने खरिप, रब्बी व उन्हाळी हंगामापरत्वे घेतलेल्या तीन पिक पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. निदान भुईसपाट होण्याची रिस्क (धोका) निश्चत कमी होते.केळी बागायतीला रामरामभगवान पाटील यांचेकडे दहा बिगे सामायिक शेती आहे. गिरणाकाठावर विहीर व तेथुन पाईपलाईन आणली आहे. काळी कसदार जमीन आहे. पाणी मुबलक असल्याने चार-पाच हजार केळीखोड ते लावत. मात्र केळीवर येणारा करपा, केळी बागेतच पिकणे, दुष्काळात पाणीटंचाई अन् केळीमाल पक्व होऊनही कटाईसाठी व्यापाºयांची मनधरणी, शिवाय बोर्ड भावापेक्षा कमी भाव याला कंटाळुन त्यांनी केळी लावणेच सोडले.नफा-तोटा मेळ बसतो.केळी ऐवजी तीन बिघ्यात घेतलेल्या मुग, मका, बाजरी या तीन पिकात तिनही हंगामात मिळऊन त्यांना तीन लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपये उत्पन्न आले तर मशागत, खते, कापणी ,काढणी असा त्यांना त्रेचाळीस हजार दोनशे रुपये खर्च झाला. यानुसार ऐन दुष्काळी सालात त्यांना दोन लाख शहाण्णव हजार दोनशे इतका नफा झाला. शिवाय केळी बागायतदारांप्रमाणे उन्हाळ्यात तापमान वाढले, पाणी कमी पडले ही चिंता न सतावता उशाला हात घालताच शांत झोप लागते. हे मानसिक समाधान पैसा मोजुन मिळणार नाही. तीन हंगामात नैसर्गिक आपत्तीत एखादा वाया गेला तरी दुसºयात भर निघते. जुन २०१८ ते मे २०१९ या कालावधीत तीन पिक घेतल्यानंतर या खरिपात पुन्हा कपाशी लागवड करुन झाली.केळी हीच मानसिकता का ?शेतकरी केळीला का पसंती देतो? यामागे पारंपारिक पीक, एकदा लावले की वर्षभर ठीबकने पाणी सोडा, खते द्या, निंदणी , एखादी किटकनाशक, बुरशीनाशक फवारणी याउपर वेगळे काही करायची आवश्यकता नाही. व्यापारी बांधावर येतो. (आता उलट व्यापाºयाची मिन्नतवारी सुरु झाली आहे) माणसे पाठवतो, कटाई करतो. एक ठोक व ऐन पावसाळ्यात पैसा हाती खेळतो. केळीबागायतदार ही प्रतिष्ठा (नव्हे मानसिकता).यामुळे एकदा केळीची चटक लागली की मग नुकसान 'नफा-तोटायाचे गणीत न जुळले तरी मृगजळाप्रमाणे शेतकरी या पिकामागे धावतच राहतो अन्दम तोडतो. याउलट हंगामी पिकात दरवेळेस मशागत, काढणी, कापणी असा मजुराशी संबध येतो व मजुरटंचाई मुळे शेतकरी हतबल होतो. हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्यास तोटा होतो. हंगाम संपल्यावर टप्प्याटप्याने पैसा येतो त्यामुळे पैसा हाती लागत नाही, ही मानसिकता बनलेली. बाजारसमित्यांमधे जाऊन माल विकावा लागतो.असे हे शेतक-यांचे यामागचे धोरण आहे.