शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्थिर सर्व्हेक्षण पथकांच्या करड्या नजरेतही आरटीओ चेकपोस्ट नाक्यावर पंटरांकडून वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 16:32 IST

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील आचारसंहितेच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या चोरवड मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर नियुक्त करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकांच्या करड्या नजरेतही साखळी पद्धतीने ओव्हरलोड वा विना परवाना वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई न करता संबंधित मोटार वाहन निरीक्षकांनी रात्रंदिवस आपापल्या पंटरांकडून सोयीस्कररीत्या वसुलीचा गोरखधंदा मांडल्याची आचारसंहितेच्या गर्तेत मोठी चर्चा आहे.

ठळक मुद्देरावेर : उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरीला चाट देवून भरला जातो गल्लावसुली टाळण्यासाठी अवजड वाहतूक वळविली जाते अन्य मार्गे

रावेर, जि.जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील आचारसंहितेच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या चोरवड मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर नियुक्त करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकांच्या करड्या नजरेतही साखळी पद्धतीने ओव्हरलोड वा विना परवाना वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई न करता संबंधित मोटार वाहन निरीक्षकांनी रात्रंदिवस आपापल्या पंटरांकडून सोयीस्कररीत्या वसुलीचा गोरखधंदा मांडल्याची आचारसंहितेच्या गर्तेत मोठी चर्चा आहे.निवडणुका निर्भयतेने तथा शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने बेकायदेशीरपणे मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी कुणी पैसा, दारू वा शस्त्रास्त्रांचा वापर करू नये, यासाठी स्थिर सर्व्हेक्षण पथकांची सीमा तपासणी नाक्यांवर नाकाबंदी करून भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने चोरवड या मध्य प्रदेश सीमेवरील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर स्थिर सर्व्हेक्षण पथकाची इन-कॅमेरा नियुक्ती करण्यात आली आहे. कोणताही उमेदवार वा राजकीय पक्षांकडून अवैध दारू, पैसा वा शस्त्रास्त्रे आयात होऊ नयेत म्हणून बेकायदेशीर कृत्यावर आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने पथकाचा तिसरा डोळा उघडला आहे.मात्र उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रशासनानेच या स्थिर सर्व्हेक्षण पथकाच्या करड्या नजरेवर झापडी बसवून बेकायदेशीर वसुली होत असल्याचे चित्र आहे. चोरवड सीमा तपासणी नाक्यावर एकीकडे स्थिर सर्व्हेक्षण पथकातील नियुक्त अधिकारी व पोलीस वाहनांची कसून तपासणी करून चौकशी करीत असताना दुसरीकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षकांची खासगी पंटर मोटार वाहनाच्या सहा, दहा, बारा वा चौदा चाकी अवजड वाहनांच्या ‘ओव्हरलोड’ची अवैध वसुली होत असल्याची गंभीर बाब झोपी गेलेल्या शासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी असल्याची टीका जनसामान्यांमधून होत आहे.क्षमतेपेक्षा जास्त भार असलेल्या व नियमीतपणे या सीमा तपासणी नाक्यावरून ये-जा करणाऱ्या ठरावीक ट्रान्सपोर्टच्या अवजड वाहनांची या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नाक्यावरील अधिकाऱ्यांशी साखळी पद्धतीने अवैध वसुलीची नाळ जुळली असल्याचा भंडाफोड राज्याचे तत्कालीन परिवहन राज्यमंत्री संजय सावकारे यांनी चोरवड सीमा तपासणी नाक्यावर अकस्मात धाड टाकून केला होता. कथित कार्डधारकांना कितीही ओव्हरलोड असला तरी उपप्रादेशिक परिवहन विभागाची दंडात्मक पावती न फाडता वैयक्तिकरित्या संबंधित मोटार वाहन निरीक्षकांची ठरलेली रक्कम पंटरांकडून वसुली करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची ती बाब अव्याहतपणे सुरू आहे.भुसावळ-नागपूर महामार्गावरील पुरनाड सीमा तपासणी नाक्यावर आॅनलाईन सीसीटीव्हीचे अधिपत्याखाली कायदेशीर वसुली सुरू असल्याने त्या मार्गावरील बहुतांशी ओव्हरलोड रहदारी खानापूर -चोरवड-लोणी मार्गे मोठ्या प्रमाणात वळली आहे. परिणामी दिवस व रात्रभरात रहदारीतील हजारो वाहनांकडून खाजगी पंटर किती वसुली करतात आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरीत किती कर टाकतात? हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे.