पहूर, ता. जामनेर : पहूरपेठ येथील संतोषी माता नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक नजीर चिंधा तडवी (५४) यांचे शनिवारी शाळेतच कर्तव्यावर असताना ह्रदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले.शनिवारी सकाळ सत्रात शाळा असल्याने नेहमी प्रमाणे तडवी शाळेत आले. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांना शाळेतच ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात तडवी यांचा मृतदेह हलविण्यात येऊन शवविच्छेदन करण्यात आले.तडवी यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी, पाच भाऊ असा परिवार आहे. अपंगत्वावर मात करून त्यांनी विद्यादानाचे काम केले. त्यांच्या अकाली निधनाने शिक्षण क्षेत्रासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पहूर येथे जि.प.शाळेच्या शिक्षकाचा शाळेतच ह्रदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:45 IST