शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 14:02 IST

महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाच्या आदेशानुसार सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पी. आर. हायस्कूल सज्जधरणगाव : पालिकेने केली शाळा सॅनिटायझराईज

धरणगाव : महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाच्या आदेशानुसार सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. यासाठी गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकमहोत्सवी पी.आर. हायस्कूलची तयारी पूर्ण झाली आहे. सुटीच्या काळात पी.आर. हायस्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने स्वतः शालेय परिसराची स्वच्छता करुन शाळेसाठी आपले योगदान दिले आहे. शालेय विभाग तथा गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे आणि धरणगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.एस.पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व सूचनांचे पालन केले जात आहे. पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष नीलेश सुरेश चौधरी यांच्या पुढाकाराने सर्व शाळा आणि शाळेचा परिसर सॅनिटायझराईज करण्यात आला आहे. नगराध्यक्ष चौधरी यांनी शाळेला पल्स आॅक्सीमिटर, थर्मा मिटर आणि सॅनिटायझर पुरवले आहे, तर जळगावच्या एका संस्थेने शाळेला हॅन्डस फ्री सॅनिटायझर मशिन भेट दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाणार आहे.संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष वसंतराव गालापुरे, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारीया यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत आहे. शाळेतील सर्वच्या सर्व ४८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची कोविड टेस्ट झाली असून सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. रोज दुपारी १२ ते ३ या दरम्यान तीन ते चार तासिका होणार असून एका बाकावर एक याप्रमाणे विद्यार्थी बैठक करण्यात आली आहे. शाळेतील इयत्ता नववी व दहावीच्या वर्गांची विद्यार्थी संख्या ५५० असून आतापर्यंत शंभर पालकांचे संमतीपत्र प्राप्त झाले आहेत, गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने शाळेत येण्यासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत. पालकांनी आपल्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत त्यांच्यासाठी शाळेने ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले आहे, अशी माहिती मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी दिली.

टॅग्स :SchoolशाळाDharangaonधरणगाव