शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रांजणगावातून शालेय पोषण आहाराची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 16:25 IST

राजंणगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरीभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालयातून १४ क्विंटल तांदुळ व २५ किलो वाटाणा, १ क्विंटल मठ असा ५२ हजार ३८४ रुपए किंमतीचा शालेय पोषण आहार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे५२ हजार रुपये किंमतीचे धान्य लांबविलेचाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

चाळीसगाव : राजंणगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरीभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालयातून १४ क्विंटल तांदुळ व २५ किलो वाटाणा, १ क्विंटल मठ असा ५२ हजार ३८४ रुपए किंमतीचा शालेय पोषण आहार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा आहार चोरून नेण्यासाठी चार चाकी वाहनाचा वापर करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती अशी की, राजंणगाव येथील हरीभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालयातील शिपाई निंबा चव्हाण हे १२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शाळा उघडण्यासाठी गेले असता हा प्रकार उघड झाला.ही घटना मंगळवार ११ रोजी सायंकाळी ४.३० ते बुधवार १२ रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली आहे. चोरट्यांनी शालेय पोषण आहार ठेवल्या जाणाऱ्या कोठाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे २२ हजार ५०० रुपए किंमतीचा १४ क्विंटल ८१ किलो तांदुळ, एक हजार रुपए किंमतीचा १ क्विंटल ५० किलो मठ, १ हजार रुपए किंमतीचे २५ किलो वाटाणे, ४ हजार ९५० रुपए किंमतीचा १ किंटल १० किलो हरभरा, असा एकूण ५२ हजार ३८४ रुपए किंमतीचा शालेय पोषण आहार चोरून नेला.याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी नारायण देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार किशोर सोनवणे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव