शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

धुळ्यात कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 17:56 IST

धुळे जिल्ह्यात तीन वर्षात अडीच हजार विद्यार्थ्यांना मिळाली ५८ लाखांची शिष्यवृत्ती

ठळक मुद्देशिष्यवृत्तीसाठी नववीपासून किमान ६० टक्के गुण आवश्यकअपंगांसाठी टक्केवारीची अट ठेवण्यात आलेली नाहीपाठ्यपुस्तक सहाय्य योजनेत २३० विद्यार्थ्यांना २ लाख २८ हजार रूपयांचे अर्थसहाय्य

आॅनलाईन लोकमतधुळे, दि.३० : शिक्षणाचा खर्च प्रचंड वाढलेला आहे. केवळ पैसे नाही म्हणून शिक्षण थांबता कामा नाही यासाठी कामगार कल्याण मंडळातर्फे कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. गेल्या तीन वर्षात धुळे जिल्ह्यातील अडीच हजार विद्यार्थ्यांना तब्बल ५८ लाख १० हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांना चांगलाच ‘आधार’ मिळालेला आहे.या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी कामगाराने कामगार कल्याण मंडळाचे सभासद असणे गरजेचे आहे. कामगारासाठी वार्षिक सभासद फी १५ रूपये तर कुटुंबियांसाठी २० रूपये असते. धुळ्यात जवळपास ३५०० सभासद आहेत.कामगार कल्याण मंडळातर्फे दहावी ते पदव्युत्तरपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येत असते.धुळे , शिरपूर , दोंडाईचा या कार्यालया मार्फत कामगार कुटुंबियाच्या विद्यार्थ्यांना सन २०१५ ते २०१७ या तीन वर्षात २५०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांना तब्बल ५८ लाख १० हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. सर्वसाधारण शिष्यवृत्तीसाठी नववीपासून किमान ६० टक्के गुण आवश्यक आहे. तर अपंगांसाठी टक्केवारीची अट ठेवण्यात आलेली नाही.याशिवाय पाठ्यपुस्तक घेण्यासाठीही या मंडळातर्फे सहाय्य मिळत असते. ११ वीपासून पुढे क्रमिक पुस्तकांच्या ५० टक्के रक्कम मिळत असते. तर एटीकेटी विद्यार्थी पात्र व  विद्यार्थ्यांना १०० टक्के रक्कम मिळत असते. पाठ्यपुस्तक सहाय्य योजनेत २३० विद्यार्थ्यांना २ लाख २८ हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात आलेले आहेत.एमएससीआयटीसाठीही कामगार कल्याण मंडळ कामगारांच्या पाल्यांना मदत करीत असते. यात फीची ५० टक्के रक्कम मिळत असते. एमएससीआटी योजनेत २०० विद्यार्थ्यांना तीन वर्षात ३ लाख ५३ हजार रूपयांची रक्कम वाटप करण्यात आले आहेत. तर गंभीर आजार असलेल्या कामगारांनाही २५ हजार रूपयांपर्यंत मदत मिळत असते.ांभीर आजार सहाय्य योजनेत ५५ अर्जदारांना १० लाखांची मदत करण्यात आल्याची माहिती चितोड केंद्राचे संचालक भरत वाघारे व देवपूर केंद्राचे संचालक दिलीप शिंपी यांनी दिलेली आहे.

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनDhuleधुळे