शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा रुग्णालयात औषधींचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 12:50 IST

लोकल पर्चेससाठी निधीची अडचण

ठळक मुद्देआठ ते नऊ महिन्यांपासून मनोरुग्ण औषधांपासून वंचित

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २२ - जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाल्याने आता आरोग्य विभागाकडून येणारा निधी यासाठी खर्च करता येत नसल्याने जिल्हा रुग्णालयात औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामध्ये गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून मनोरुग्णांना औषधी मिळत नसल्याच्या तक्रारीसह खोकल्याचीही औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. दरम्यान, निधीअभावी लोकल पर्चेसही करता येत नसल्याचीही समस्या आहे, मात्र आपत्कालीन स्थितीत रुग्ण वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांच्यावतीने सांगण्यात आले.जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाल्याने आता आरोग्य विभागाकडून येणारा निधी यासाठी खर्च करता येत नाही. त्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याची पूर्तताच सुरू असल्याने वैद्यकीय विभागाकडूनही सहजासहजी निधी मिळत नाही.तसे पाहता आॅक्टोबर २०१७मध्ये जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे गेल्यानंतर जवळपास पाच महिने आरोग्य विभागाकडून औषधी, आॅक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. मात्र आता जिल्हाभरातील रुग्णालयांमध्येच सुविधा देण्यावर भर दिला जात असल्याने आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रुग्णालयांमध्ये औषधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यात आता निधीदेखील संपल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे असलेल्या जिल्हा रुग्णालयाने त्यांनाच व्यवस्था करण्याचे कळविले. त्यामुळे आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.मनोविकाराची औषधी नाहीगेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून तर मनोविकारावरील औषधी संपल्याचे रुग्णांना सांगितले जात आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ही औषधी वाटप केली जाते. त्यासाठी जिल्हा भरातील मनोरुग्ण येथे औषधी घेण्यासाठी येत असतात. मात्र औषधीच नसल्याने त्यांना माघारी परतावे लागते. तसेच ही औषधी बाहेरून खरेदी करा, असे सांगून ती लिहून दिली जाते, मात्र अनेकांची परिस्थिती नाजूक असल्याने त्यांचे हाल होतात. या संदर्भात शहरातील रामनगरातील रहिवासी असलेल्या एका जणाने सांगितले की, औषधीसाठी वारंवार चकरा मारल्या तरी औषधी मिळत नाही. या बाबत विचारले असता उद्धटपणे उत्तर दिले जाते, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या सोबतच खोकल्याचेही औषधी येथे उपलब्ध नाही.वरिष्ठ पातळीवरील पुरवठ्यावर अवलंबूनकेंद्रीय पद्धतीने औषधी खरेदी होऊन ती वरिष्ठ पातळीवरूनच पुरविली जाते. सध्या या पुरवठ्यात वरिष्ठ पातळीवरूनच अडचणी येत असल्याची माहिती मिळाली.‘लोकल पर्चेस’साठीही निधी नाहीगेल्या दोन महिन्यांपासून विविध प्रकारच्या औषधी संपल्या असून ‘लोकल पर्चेस’साठीही निधी उपलब्ध नसल्याने अडचण येते. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने लोकल पर्चेस करता येत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे.वरिष्ठ पातळीवरून औषधींचा पुरवठा होतो. निधीची अडचण आहे, मात्र आपत्कालीन प्रसंगी रुग्णास आवश्यक औषधी तत्काळ उपलब्ध करून दिले जातात. रुग्णांची अडचण होणार नाही, याची दक्षता घेतली जाते.- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव