शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

सावित्रीच्या लेकिंची गगण भरारी, तीन जणींच्या हाती ‘कायद्याची काठी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:49 IST

मटकी विक्रेत्या पित्याच्या ‘लक्ष्मी’ची पावले पोलीस दलात

जळगाव : प्रतिकूल परिस्थिती असो की संसाराची जबाबदारी, या सर्व पातळीवर यशस्वी होत जिल्ह्यातील तीन जणींनी प्रचंड चिकाटी, जिद्द या बळावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळविला आहे. विविध क्षेत्रात गगणभरारी घेणाऱ्या सावित्रीच्या लेकींनी आता कायद्याटी काठीदेखील हाती घेत पालकांचे स्वप्न सत्यात उतरविले आहे.पहूर, ता. जामनेर /एरंडोलजामनेर तालुक्यातील पहूर येथील कसबेतील रहिवासी सुरेश दामू करंकार यांची बिकट परिस्थिती असल्याने कुटुंबाचा उदारनिर्वाह चालविणे व मुलांचे शिक्षण करणे जिकरीचे होते. पण मुलांना शिकविण्यासाठी जिद्द असल्याने गावात मटकी विक्री करून मुलांना उच्च शिक्षित केले. अशा प्रतिकूल परिस्थितीतून त्यांची कन्या लक्ष्मीचे पावले पोलीस दलात पडले आहे. वडील सुरेश करंकाळ यांनी गावात दररोज सकाळी मटकी विक्री करून लक्ष्मीला शिक्षण देण्याचे काम सुरू ठेवले. या सोबतच लक्ष्मी कंरकाळ यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली पोलीस उपनिरीक्षक होण्याचे धेय्य गाठले.सासरच्यांकडून प्रेरणालक्ष्मीच्या खडतर प्रवासात आई वडिलांबरोबरच सासरच्या मंडळींचा विशेष करून पती राहुल अशोक चौधरी यांचा सिंहाचा वाटा आहे. लक्ष्मी करंकाळ यांचा विवाह नऊ महिन्यांपूर्वी एरंडोल येथे झाला. सासरच्यांनी लक्ष्मी यांची मेहनत पाहून त्यांना या परीक्षेसाठी प्रेरणा दिली.पहूर येथे लक्ष्मीचा नागरी सत्कारपहूर, ता. जामनेर - पोलीस उप निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मी सुरेश करंकार यांचा कसबे ग्रामपंचायतच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट होते. लक्ष्मी करंकार यांचे वडील सुरेश करंकार, आई चंद्रकला करंकार यांच्यासह अमोल पांढरे, राहुल सोनवणे, संदेश काळे यांची भारतीय सैनिक दलात निवड झाल्याबद्द सन्मान करण्यात आला. यावेळी पेठ सरंपच नीता पाटील, पं.स.सदस्या पूजा भडांगे, कसबेचे उपसरपंच योगेश भडांगे, पेठचे माजी सरंपच प्रदीप लोढा, गटविकास अधिकारी अजय जोशी, सहायक गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, माजी पं.स.सभापती बाबुराव घोंगडे, उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समिती प्रमुख रामेश्वर पाटील, अ‍ॅड. संजय पाटील, विकासो कसबे चेअरमन सुधाकर घोंगडे आदी उपस्थित होते.कजगावच्या लेकीची वाजत-गाजत मिरवणूककजगाव, ता. भडगाव - येथील सेवानिवृत्त शिक्षक अशोक आनंदा सोनवणे यांची कन्या राजश्री सोनवणे यांनी लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून थेट पोलीस उपनिरीक्षक पदी मजल मारली आहे. विशेष म्हणजे कजगाव सारख्या मोठ्या गावातून आतापर्यंत कोणीही थेट लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू झाले नव्हते. मात्र राजश्री सोनवणे यांनी अथक परिश्रम घेऊन बुद्धीमतेच्या जोरावर राज्यातून अनुसूचित जातीच्या गटातून ५वा क्रमांक मिळविला.राजश्री सोनवणे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवड झाल्याने गावात समाधानाचे व आनंदी वातावरण आहे. गावातील पहिलीच कन्या पोलीस उपनिरीक्षक झाल्याने त्यांची गावातून बसस्थानकपासूूून वाडे रोड पंचशील नगरमार्गे त्यांच्या घरापर्यंत उघड्या जीपमधून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. आपल्या या यशाबद्द बोलताना राजश्री सोनवणे यांनी सांगितले की, लहानपणापासून एक अधिकारी होण्याची इच्छा होती. त्यामुळे कठोर अभ्यास करून यश मिळवले. भविष्यात अजून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपअधीक्षक होण्याची इच्छा आहे.अंकिताने केले गावाचे नाव मोठेचोपडा - तालुक्यातील घोडगावची अंकिता एकनाथ बाविस्कर ही पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक झाली आहे. घोडगाव येथील रहिवाशी व हातेड येथे पाटबंधारे विभागात उपनिरीक्षक म्हणून काम पाहणारे एकनाथ भिकारी पाटील व घोडगाव येथील अंगणवाडी सेविका संगीताबाई एकनाथ पाटील यांची मुलगी अंकिता एकनाथ बाविस्कर ही महाराष्ट्रातून (ओबीसी) तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. घोडगाव परिसरातून पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून गावाचे व परिसराचे नाव मोठे केले असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव