शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

पाचोरा येथील गो.से.हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 14:22 IST

पाचोरा येथील गो.से.हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

पाचोरा : येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो.से. हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संस्थेचे  चेअरमन संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शालेय समितीचे चेअरमन  खलील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा महिला शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षिका  सुखदा पाटील यांना सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका पी.एम.वाघ यांनी केले. संस्थेचे चेअरमन संजय वाघ तसेच पर्यवेक्षक अजय अहिरे यांनी मनोगतातून सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या उदात्त कार्याचा आढावा घेतला.यावेळी श्वेता आवारे, भूमी पाटील, श्रावणी सोमवंशी, श्रुती शिंपी,शितल बोरुडे, जान्हवी पाटील, आकांक्षा कुहरे, सक्षम कौंडिण्य या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून खलील देशमुख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. व्यासपीठावर  तांत्रिक  विभागाचे  चेअरमन  वासुदेव महाजन, मुख्याध्यापक  सुधीर पाटील, पर्यवेक्षक आर.एल.पाटील, एन.आर.पाटील,  तांत्रिक विभागप्रमुख  एस.एन.पाटील, किमान कौशल्य विभागप्रमुख मनीष बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. ईशस्तवन सागर थोरात आणि रुपेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी, तर आभार सी.एल.जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Educationशिक्षणPachoraपाचोरा