शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाचवा...नाही तर तो मारुन टाकेन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 21:18 IST

वैजापूर येथे अत्याचार झालेल्या सहा वर्षाच्या बालिकेवर बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली तर दुस-या बहिणीवरही उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, अत्याचारानंतर पीडित बालिकेने रस्त्याने जाणाºया दाम्पत्याला थांबवून त्यांचे पाय धरले...आम्हाला वाचवा..तो मारुन टाकेन अशी विनवण्या करायला लागल्याने या घटनेचे बींग फुटले.

ठळक मुद्देवैजापूरची अत्याचारीत बालिका बचावासाठी करीत होती विनवण्याबालिकेवर तातडीची शस्त्रक्रियाघटनेच्या निषेधार्थ दोन दिवस मोर्चा
जळगाव : वैजापूर येथे अत्याचार झालेल्या सहा वर्षाच्या बालिकेवर बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली तर दुस-या बहिणीवरही उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, अत्याचारानंतर पीडित बालिकेने रस्त्याने जाणाºया दाम्पत्याला थांबवून त्यांचे पाय धरले...आम्हाला वाचवा..तो मारुन टाकेन अशी विनवण्या करायला लागल्याने या घटनेचे बींग फुटले. चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता देवेंद्र राजेंद्र भोई (२२, रा.वैजापूर) याने एका सहा वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला तर दुस-या चुलत बहिणीवरही अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दरम्यान, तिसरी मुलगी तेथून पळून गेल्याने ती बचावली आहे. संशयित देवेंद्र भोई याला मध्यरात्री दीड वाजता पोलिसांनी अटक केली आहे. दोन सख्या बहिणी व एक त्यांची मैत्रिण अशा तिघं जण गावाबाहेर शौचास गेल्या असता देवेंद्र याने ही संधी साधून कुकर्म केले. त्यात एका बालिकेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली.वाचवा, नाही तर तो मारुन टाकेन !घटना घडली तेव्हा दुचाकीचा आवाज ऐकून संशयित तेथून पळून गेला. रस्त्याने दुचाकीने जात असलेल्या गावातीलच दाम्पत्याला या बालिकेने थांबविले, आणि त्यांचे पाय धरले. आम्हाला वाचवा..तो मारुन टाकेन असे बोलत होते. यावेळी दोन्ही बहिणी प्रचंड भेदरलेले होत्या तर एकीचा रक्तस्त्राव सुरु होता. हा प्रकार पाहून या दाम्पत्याने दोघांना गावात आणले नंतर गावक-यांनी वैजापूर आरोग्य केंद्रात नेले. तेथे तपासणीअंती बालिकेवर अमानूष पध्दतीने अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या माध्यमातून या दोन्ही बहिणींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बुधवारी दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.संपूर्ण गाव मुलींजवळ संशयित घरातदोन सख्ख्या चुलत बहिणीवर अत्याचार झाल्याची माहिती गावात पसरताच संपूर्ण गाव दोन्ही बहिणींच्या घरी जमले. हा प्रकार कोणी केला याचीच चर्चा सुरु असताना देवेंद्र भोई व त्याचे कुटुंब घरात होते. संपूर्ण गाव एका ठिकाणी तर फक्त संशयितच घरात होता. पलायन केलेल्या तिस-या मुलीने संशयिताचे नाव सांगितले व नंतर त्याला ओळखलेही. त्यामुळे रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. घटनेच्या निषेधार्थ दोन दिवस मोर्चाया घटनेच्या निषेधार्थ तसेच संशयिताविरुध्द अ‍ॅट्रासिटीचे वाढीव कलम लावावे, खटला जलदगती न्यायालयात चालवावा व त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी १५ आगस्ट रोजी आदीवासी वसतीगृह विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. १६ आॅगस्ट रोजी सकाळी वाजता लोकसंघर्ष मोर्चा व इतर विविध संघटना यांच्यावतीने चोपडा येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात सहभागाचे आवाहन डॉ.चंद्रकांत बारेला, प्रतिभा शिंदे, प्रकाश बारेला, संजय शिरसाठ, बुधा बारेला, गाजू बारेला, धर्मा बारेला, प्रदीप बारेला, संदीप मोरे, मोतीलाल बारेला, ज्ञानेश्वर भादले, रघुनाथ जोशी, सचिन धांडे, विनोद देशमुख, संजू बारेला, दयाराम बारेला,दिनू बारेला यांनी केले आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव