शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सेवाव्रती मीरा कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 19:09 IST

केशवस्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे दिला जाणारा पुरस्कार यंदा वैयक्तिक गटात मूळच्या जळगावच्या व गेली २० वर्षे आसाममध्ये सेवा कार्य करणाºया मीरा रघुनाथ कुलकर्णी यांना जळगाव येथे ४ मार्च रोजी दिला जाणार आहे. त्यांच्या निस्पृह सेवा कार्याचा, त्यांचे समकालिन डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण यांनी घेतलेला हा आढावा.जळगाव येथील विवेकानंद ...

केशवस्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे दिला जाणारा पुरस्कार यंदा वैयक्तिक गटात मूळच्या जळगावच्या व गेली २० वर्षे आसाममध्ये सेवा कार्य करणाºया मीरा रघुनाथ कुलकर्णी यांना जळगाव येथे ४ मार्च रोजी दिला जाणार आहे. त्यांच्या निस्पृह सेवा कार्याचा, त्यांचे समकालिन डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण यांनी घेतलेला हा आढावा.जळगाव येथील विवेकानंद केंद्राच्या कार्याची सुरुवात १९९२ साली झाली. केंद्राच्या पहिल्या युवा प्रेरणा शिबिरात मीरा कुलकर्णी शिबिरार्थी म्हणून उपस्थित होती. शिबिरातील वागणे, सहभाग आणि एकंदरीत देशभक्ती व देशप्रेम याबद्दलचा चर्चासत्रातील सहभाग, मतप्रदर्शन आणि आपण भारत मातेसाठी काही केले पाहिजे या तळमळीने तिची आम्हास एक वेगळी ओळख झाली. तिच्या या शिबिरापासूून ती विवेकानंद केंद्राची सक्रिय कार्यकर्ती झाली.त्या वेळी जळगाव येथे बालसंस्कार, वाचन संस्कार वर्ग, ओंकार ध्यान, भजनसंध्या, शालेय व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, युवा प्रेरणा शिबिर, योग, प्राणायाम वर्ग, भारतीय संस्कृती परीक्षा, समता नगर वाचनवर्ग इत्यादी कार्यक्रम वर्षभर चालत. हे सर्व उपक्रम मीरा व इतर युवा कार्यकर्त्यांमुळे यशस्वी होऊ शकले. अशा या कार्यक्रमांनी मीरा ही केंद्राच्या कार्यात सक्रिय झाली. रवी कुलकर्णी व मीरा हे जळगाव येथे जनता सहकारी बँकेच्या ओंकारेश्वर शाखेच्या इमारतीत अनेक वर्षे योगासन वर्ग घेत असत.मीरा ही मू.जे. महाविद्यालयाची व विशेषत: प्राचार्य अनिल राव सरांची वाणिज्य शाखेची आवडती व हुशार विद्यार्थिनी. मीरा उत्तर महाराष्टÑ विद्यापीठात एम.कॉम.ला द्वितीय आली आणि तिने आयसीडब्ल्यूएचा एक ग्रुपही पूर्ण केला. परंतु तिला आपल्याकडील गुणवत्तेने चांगल्या पगाराची नोकरी करण्याची इच्छा नव्हती. सातत्याने डॉ. अविनाश आचार्य व प्राचार्य राव सरांच्या बैठकीत हा विषय व्हायचा. मीरा केंद्राच्या कार्यात स्थिरावली. १९९७ साली विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे उपाध्यक्ष बालकृष्णन हे जळगावी आले. पिंपळदचा कार्यक्रम झाल्यानंतर जळगावला परत निघताना, मीराने ललितातार्इंना मिठी मारली आणि रडत म्हणाली, ‘मला जीवनव्रत्ती व्हायचे आहे, पूर्ण वेळ काम करायचे आहे. भारत मातेची सेवा करण्यासाठी माझा जन्म झाला आहे. मला कन्याकुमारीला येथूनच जायचे आहे. तिचा देशसेवेचा हा निर्णय स्तुत्य होता. हा प्रसंग डॉ. अविनाश आचार्य दादांना सांगितला. ते दादा म्हणाले, तू काळजी करू नको. आपण तेथे तिची काही व्यवस्था करू. तत्काळ दादांनी तिला बँकेत आॅडिट आॅफिसर म्हणून नोकरी दिली. पण ती नोकरीच्या पाशात रमणारी मुलगी नव्हती. एक दिवस ती आॅडिटनिमित्त भुसावळला गेली. तेथून सरळ रेल्वेने तिने कन्याकुमारी गाठले. जीवनव्रती, पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केले. आज तिचे आसाम येथील प्रांत संघटक, चहाच्या मळ्यातील कामगारांच्या मुलांचे शिक्षण, केंद्राच्या शाळा, लोकसहभागातून कामे, राष्टÑीय पातळीवरील तिची जबाबदारी पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्मृती इराणी यांनी दिल्लीहून बोलावून विशेष कार्यक्रमात सहभागी केले. तिचे हे काम आमच्यासाठी विशेषत: जळगावकरांसाठी भूषणावह आहे.-डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण, परीक्षा नियंत्रक, एमआयटी विद्यापीठ, पुणे

टॅग्स :Jalgaonजळगाव