शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सासरवाडीला आला अन् घरफोड्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:03 IST

 धाडसी घरफोडी व चोºयांमध्ये मास्टरमार्इंड असलेला कुंदनसिंग सुरजसिंग जुन्नी (वय २१, रा.चिंबी पाडा, अंबाडी रोड, भिवंडी जि.ठाणे) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन गुरुवारी अटक केली. न्यायालयाने त्याला २८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  कुंदनसिंग याची जळगाव सासरवाडी असून सासºयाकडे मुक्कामाला असताना त्याने शहरात घरफोडी केल्याचा संशय पोलिसांना आहे, किंबहूना तसे तांत्रिक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.

ठळक मुद्देअट्टल गुन्हेगारास एलसीबीने पकडले  शहरात अनेक घरफोड्या केल्याचा संशयसाथीदारांवर २१ ठिकाणी गुन्हे दाखल

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६  :  धाडसी घरफोडी व चोºयांमध्ये मास्टरमार्इंड असलेला कुंदनसिंग सुरजसिंग जुन्नी (वय २१, रा.चिंबी पाडा, अंबाडी रोड, भिवंडी जि.ठाणे) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन गुरुवारी अटक केली. न्यायालयाने त्याला २८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  कुंदनसिंग याची जळगाव सासरवाडी असून सासºयाकडे मुक्कामाला असताना त्याने शहरात घरफोडी केल्याचा संशय पोलिसांना आहे, किंबहूना तसे तांत्रिक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुंदनसिंग जुन्नी हा मुळचा भिवंडी येथील आहे. त्याने त्याचे साथीदार रामसिंग उर्फ चोनसिंग श्रीराम टाक व भूमीसिंग टाक या दोघांच्या मदतीने २०१५ मध्ये वसई येथील वालीव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोती ज्वेलर्स (सातीवली नाका, ता.वसई जि.पालघर ) फोडून तेथून २० लाखाचे सोन्याचे दागिने व ६ लाखाची चांदी चोरुन नेली होती. या गुन्ह्यात तो अद्याप फरार आहे.

असा आला कुंदनसिंगवर संशय गेल्या वर्षी त्याने तांबापुरा येथील एका मुलीशी विवाह केला. त्यानिमित्ताने त्याचे जळगाव शहरात येणे-जाणे वाढले. तो जेव्हा शहरात होता,तेव्हा घरफोडीचे गुन्हे घडले आहेत. त्या काळात रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगार कारागृह किंवा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला अटकेत होते. तसेच रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या वेळी पोलिसांनी जुन्नी याच्या नात्यातील एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी आणले तेव्हा त्याचा शालक पोलीस ठाण्यात जाब विचारण्यासाठी आला होता, त्यामुळे कुंदनसिंग याच्यावरच पोलिसांचा संशय होता. तो शहरात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक निरीक्षक सागर शिंपी, सहायक फौजदार नुरोद्दीन शेख व रवी पाटील यांचे पथक त्याच्या शोधार्थ पाठविले होते. मिळालेल्या गुप्त ठिकाणावरुन या पथकाने त्याला मध्यरात्री ताब्यात घेतले.

साथीदारांवर २१ ठिकाणीगुन्हे दाखलकुंदनसिंग व त्याच्या साथीदारांवर महाराष्टÑ व गुजरातमध्ये घरफोडी, दरोडा,चोरी, लुटमार, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे २१ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यात मनमाड, मनोर, डहाणू, वापी, बिल्लीमोरा, बारडोली, मिरा रोड, माणिकपुर, राहुरी, अहमदाबाद, भरुच, अंकलेश्वर आदी ठिकाणी हे गुन्हे दाखल असल्याची माहिती सुनील कुराडे यांनी दिली. कुंदनसिंग याला द्रौपदी नगरातील मंगला कोष्टी यांच्याकडे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.रामानंद नगरच्या हद्दीतही सव्वा लाखाची घरफोडी झाली आहे, त्यात त्याचा सहभाग असण्याची शक्यता आहे.