शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सप्तक्षृंगी माता जळगावच्या एस.टी.बस आगाराला पावली, यात्रेदरम्यान ८० लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 14:47 IST

भाविकांसाठी गडावर मारल्या ८९४ दुहेरी फेऱ्या

कुंदन पाटीलजळग़ाव : वणी (कळवण) गडावरची सप्तक्षृंगी माता जळगावच्या एस.टी.बस आगाराला पावली आहे. यंदाच्या यात्रोत्सवात जळगाव विभागाला तब्बल ८० लाखांचे उत्पन्न मिळाल्याने एस.टी.ला ऊर्जेचे इंधन मिळाले आहे.

६ एप्रिल रोजी सप्तक्षृंगी मातेची यात्रा भरते. आठ दिवस आधीच भाविकांची रेलचेल सुरु होत असल्याने सप्तक्षृंगी गडावर प्रचंड गर्दी असते. समस्त खान्देशकरांसाठी श्रद्धास्थान असणाऱ्या सप्तक्षृंगीच्या यात्रोत्सवासाठी जळगावच्या एस.टी.विभागाच्यावतीने विशेष बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. ४४७ बस सेवेसाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. दि.१ ते ७ एप्रिलदरम्यान ही सेवा पुरविण्यात आली. त्यातून जळगाव विभागाला तब्बल ८० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

प्रतिकिलोमीटर ४१ रुपये नफासप्तक्षृंगी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त ४४७ बस भाविकांसाठी पुरविण्यात आल्या होत्या. तसेच वणी गडावर जळगाव विभागातील ३५ जणांचे मनुष्यबळ भाविकांच्या सेवेसाठी रवाना झाले होते. वाहतूक नियंत्रक भगवान जगनोर यांच्या नेतृत्वाखाली विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी यात्रा प्रमुख म्हणून नेतृत्व केले. ४४७ बसगाड्यांनी गेल्या आठ दिवसात ८९४ दुहेरी फेऱ्या मारल्या. त्यातून प्रतिकिलोमीटर ४१ रुपयांचा नफा जळगाव विभागाला मिळाला. जळगाव विभागाचा यात्रोत्सवासाठी गेलेला कर्मचाऱ्यांचा ताफा शुक्रवारी सायंकाळी परतला. 

सहकाऱ्यांनी केलेल्या पद्धतशीर नियोजनामुळे जळगाव विभागाला चांगले उत्पन्न मिळाले आहे. या सहकाऱ्यांनी गेल्या आठ दिवसात प्रचंड मेहनत घेतली. म्हणूनच ‘एसटी’ला आर्थिक बुस्टर मिळाले आहे.भगवान जगनोर, विभागीय वाहतूक नियंत्रक.

टॅग्स :Jalgaonजळगाव