धरणगाव : येथे नेहरू युवा केंद्र, जय अंबे ग्रुप आणि राजीव गांधी युवा मंडळातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी ७ वाजता युवकांनी धरणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक हितेश ओस्तवाल, जय अंबे ग्रुपचे अध्यक्ष नीलेश महाले, आकाश चव्हाण, राजीव गांधी युवा मंडळाचे अध्यक्ष गौरवसिंग चव्हाण, मयूर दानेज, ललित रॉय, सुजल आणि प्रथम उपस्थित होते. उपक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांचे मार्गदर्शन लाभले.
धरणगाव येथे युवकांनी राबविले स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 15:26 IST