शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

माहिजी येथे वाळू लिलावावरून नायब तहसीलदारांवर प्रश्नांचा भडीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 20:52 IST

माहिजी, ता.पाचोरा येथील गिरणा नदीच्या वाळूचा लिलाव करण्यासाठी ग्रामस्थांचा ठराव घेण्यासाठी आलेल्या नायब तहसीलदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

ठळक मुद्देवाळू लिलावाचा ठराव देण्यास ग्रामस्थांचा विरोधगिरणा नदी काठाला लागूनगावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीआतापर्यंत आम्हाला मागील ठेक्याचा महसूल मिळाला नाही आम्ही वाहने पकडतो तर तुम्ही का येत नाही?

कुरंगी, ता.पाचोरा : येथून जवळच असलेल्या माहिजी, ता.पाचोरा येथील गिरणा नदीच्या वाळूचा लिलाव करण्यासाठी ग्रामस्थांचा ठराव घेण्यासाठी आलेल्या नायब तहसीलदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांच्यावर वाळू उपशाबाबत ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार करत वाळू ठेका न देण्यासाठी गोंधळात ठराव हरकत घेत सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत न देण्याचा निर्णय घेण्यात आला.सूत्रांनुसार, पाचोरा महसूल विभागाचे नायब तहसीलदार अमित भोईटे हे १८ रोजी माहिजी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गट नंबर ८, ९ मध्ये गिरणा नदीच्या पात्रातील वाळू लिलाव होण्यासाठी ग्रामस्थांची ग्रामसभा घेऊन ठराव घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. नागरिकांनी गिरणा नदीतून मागील ठेकेदाकडून मोठमोठे खड्डे पडले त्यावर काय कारवाई केली? शासनाने दिलेल्या ठेका हा ठेकेदाराकडून नियमानुसार वाळू वाहतूक न करता सर्व नियमांची पायमल्ली केली जाते त्यावर तुम्ही काय करता? आतापर्यंत आम्हाला मागील ठेक्याचा महसूल मिळाला नाही, आम्ही वाहने पकडतो तर तुम्ही का येत नाही? यासह अनेक प्रश्न उपस्थित करत नायब तहसीलदार अमित भोईटे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यासह गिरणा नदी काठाला लागून सामनेर लासगाव व माहिजी या गावांना पाणीपुरवठा करणाºया विहिरी आहेत, असेही यावेळी सांगितले.माहिजी ग्रामस्थांनी सर्वांच्या सहमतीने वाळू लिलाव न होऊ देण्याचा ठराव ग्रामसभेत मांडला. ग्रामसभेला शत्रूध्न साळवे, ग्रामसेवक पी.बी.पाटील, कैलास पाटील, शिवाजीराव पाटील, नरेश पाटील, अनिल सोनवणे, पोलीस पाटील राजेंद्र पाटील, विजय पाटील, समाधान पाटील, गजानन बडगुजर, कैलास पवार, युनूस बाबेखा यांच्यासह माहिती ग्रामस्थ उपस्थित होते.कुरंगी येथे वाळूचा ठराव देण्यास ग्रामस्थांचा ग्रामसभेत विरोधकुरंगी येथील गिरणा नदीपात्रातील वाळूचा लिलाव करण्याचा ठराव न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला.पाचोरा महसूल विभागाचे नायब तहसीलदार उमाकांत कडन्नोर, कुरंगी सरपंच सुरेश कोळी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली. त्यात कुरंगी येथील गिरणा पात्रातील गट नंबर ६ , २५ , ४३२ व गावठाण या ठिकाणच्या वाळू लिलाव करण्यासंदर्भांत गावाची ग्रामसभा घेण्यात आली. त्यावेळी ग्रामस्थांनी एकमताने वाळूचा लिलाव होऊ न देण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव मंजूर करून नायब तहसीलदारांकडे सोपविण्यात आला. गिरणा काठावर मोठ्या प्रमाणावर शेतकºयांच्या विहिरी आहेत. त्यावर भाजीपाला फळबागायत व इतर शेती उत्पादनाचा पाण्यामुळे मोठा फायदा होतो. त्यावर शेतकºयांचा उदरनिर्वाह चालतो. वाळू साठा गिरणापात्रात असल्याने त्याचा पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते व त्यामुळे विहिरींना पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. या कारणांमुळे ठराव न देण्यास संमती दर्शवली.यावेळी ग्रामसेवक अविनाश पाटील, विठ्ठल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रत्नराज साळुंखे, पंढरीनाथ पाटील, नामदेव पाटील, सुदामा पाटील, गुलाब साळुंखे, दादा मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :sandवाळूPachoraपाचोरा