शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात २० ठिकाणी वाळू साठ्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 13:08 IST

प्रशासनाला आली जाग

ठळक मुद्देनोटीस तयारपावत्या नसल्यास दंड ठोठावणार

जळगाव : जळगाव शहर परिसर व ग्रामीणभागातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच महसूल विभागाच्या पथकाने शहरात जवळपास २० ठिकाणी वाळू साठ्याची तपासणी केली.  या कारवाईने अवैध वाळू उपसा करणाºयांचे धाबे दणाणले असून शनिवारी धाडी टाकण्यात आलेल्या ठिकाणच्या मालकांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भरधाव वाळूच्या वाहनांमुळे दररोज अपघात होत असताना प्रशासन केवळ कारवाईचे नाटक करीत असून वाळू माफीयांवर कठोर कारवाई करण्याची हिंमत  करीत नसल्यासंदर्भात ‘लोकमत’ने शनिवारी ‘वाळू माफियांसमोर प्रशासनाने टेकले गुडघे’ या मथळ््याखाली वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त प्रकाशित होताच महसूल प्रशासन खडबडून जागे झाले व शनिवारी तीनही तलाठी व इतर कर्मचाºयांचे पथक नियुक्त करून त्यांना शहरातील वाळू साठ्यांची पाहणी करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने शहरात २० वेगवेगळ््या ठिकठिकाणी वाळू साठ्यांची पाहणी केली. या साठ्यांसंदर्भात  तहसीलदार अमोल निकम यांना माहिती देण्यात आली. त्यानुसार संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार असून त्या तयारदेखील करण्यात आल्या असल्याचे तहसीलदार निकम यांनी सांगितले. संबंधितांना या नोटीस देण्यात येऊन त्यांच्याकडील पावत्या तपासण्यात येतीव व त्या  नसल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. संबंधितांना सात दिवसात नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे. उत्तर न दिल्यास वाळू साठा जप्त करण्यात येईल, अशीही माहिती महसूल सूत्रांकडून मिळाली. 

टॅग्स :sandवाळूJalgaonजळगाव