शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात आणखी ६ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 11:54 IST

४४ गावांना २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

ठळक मुद्देटंचाईची तीव्रता वाढतेय ७१ विहिरींचे अधिग्रहण

जळगाव : जिल्ह्यात यंदा गंभीर दुष्काळी परिस्थिती असून पाणी टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हिवाळा सुरू असतानाही सध्या ४४ गावांना २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच जिल्ह्यात ६ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.यंदा जिल्ह्यात सरासरीच्या जेमतेम ६८ टक्के पाऊस झाला असून गत १५ वर्षांतील गंभीर दुष्काळ पडला आहे. जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुके यापूर्वीच गंभीर दुष्काळी तालुके म्हणून जाहीर झाले आहेत. तर अन्य दोन तालुक्यांमधील काही मंडळ ही दुष्काळी घोषीत करण्यात आले होते. मात्र या दोन तालुक्यांसह सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने या दोन तालुक्यांचाही दुष्काळी जाहीर करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.७१ विहिरींचे अधिग्रहणडिसेंबर महिन्यातच पाणीटंचाई भेडसावू लागली असून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत ६९ गावांमध्ये ७१ विहिरींचे अधिग्रहण जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्यात अमळनेर तालुक्यातील १७ गावे असून त्यापाठोपाठ मुक्ताईनगर १६ गावे, जळगाव १, जामनेर १, धरणगाव ८, एरंडोल ५, भुसावळ ७, बोदवड १, चाळीसगाव ५, भडगाव २, पारोळा ५ तर चोपडा तालुक्यातील १ गावाचा समावेश आहे.६ पाणी योजनांना मंजुरीपाणीटंचाई भेडसावत असलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात ६ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यात जळगाव तालुक्यातील जवखेडा, भडगाव तालुक्यात कजगाव, धोत्रे, बात्सर, पथराड व जामनेर तालुक्यातील पाळधी या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी पाळधीच्या पाणी योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे. तर उर्वरीत तात्पुरत्या पाणी योजनांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे.४४ गावांना टँकरने पाणीपुरवठामागील वर्षीच्या उन्हाळ्यात सुरू झालेले टँकर या वर्षी पावसाळा सुरू झाला तरीही बंद होऊ शकले नव्हते. अमळनेर तालुक्यातील काही गावांना टँकर सुरूच ठेवावे लागले होते. यंदाही पुरेसा पाऊस न झाल्याने सध्या हिवाळा सुरू असतानाही जिल्ह्यातील तब्बल ४४ गावांना २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात अमळनेर तालुक्यातच सर्वाधिक ३० गावांना १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. याखेरीज जळगाव तालुक्यातील १, भुसावळ तालुक्यातील २, मुक्ताईनगर तालुक्यातील १, चाळीसगाव ८, तर पारोळा तालुक्यातील २ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalgaonजळगाव