शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

“देवेंद्रजी आपण उद्या मुख्यमंत्री, पंतप्रधानही व्हाल; पण...”; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 08:06 IST

दिल्लीत एक वेगळीच चर्चा सुरू असून, महाराष्ट्रात काय चालू आहे? असा प्रश्‍न उपस्थित केला जातोय, असे संभाजीराजे म्हणाले.

जळगाव: चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), माजी मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली. मात्र, ती करताना केलेल्या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे महाराष्ट्राची ओळख दिल्लीत व इतिहासात वेगळी आहे. पण महाराजांच्या राज्यात मराठा, ओबीसी व अन्य आरक्षणासाठी आपण आपआपसात भांडत आहोत, या प्रश्‍नांमुळे दिल्लीत खासदारांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू असून, महाराष्ट्रात काय चालू आहे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे, असे संभाजीराजे म्हणाले. 

देवेंद्रजी आपण उद्या मुख्यमंत्री, पंतप्रधानही व्हाल

देवेंद्रजी तुम्ही आता विरोधी पक्षनेते आहात, उद्या मुख्यमंत्री व्हाल आणि भविष्यात पंतप्रधानही व्हाल. पण माझी एक अपेक्षा आहे की, शिवाजी महाराजांचे आचारविचार हे लिखित स्वरुपात सामान्यातल्या सामान्य शिवभक्तापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षा संभाजीराजेंनी यावेळी बोलताना व्यक्त केली. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी, परंतु, आता महाराष्ट्राची ओळख जपण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे, असे आवाहन संभाजीराजेंनी केले आहे. 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले याबाबत फडणवीसांनी आभार व्यक्त केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि ते खऱ्या अर्थाने युगपुरुष होते, असे देवेंद्र फडणवीसांनी नमूद केले. युगपुरुष म्हणजे, जे सामान्यांना जागृत करून त्यांच्याकडून असामान्य काम करवून घेतात. म्हणूनच अठरा पगड जातींना एकत्र करून त्यांनी रयतेचे राज्य प्रस्थापित केले, असे फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाल्याचेही पाहायला मिळाले. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस