शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

समतेची बिजे वारकरी संप्रदायाने रुजवलीत -प्रा. संदीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:58 IST

महाराष्ट्रातील विविध जाती -धर्मातील लोकांना सामावून घेण्याची ताकद वारकरी संप्रदायातील संत प्रभावळीने आम्हाला दिली असल्याचे मत प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी चोपडा येथे आयोजीत व्याख्यानात व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘प्रबोधन चळवळीतील संत साहित्याचे योगदान’ यावर व्याख्यानकठीण परिस्थितीतही प्रबोधनाचा दीप संतांनी विझू दिला नाही

चोपडा : महाराष्ट्रातील विविध जाती -धर्मातील लोकांना सामावून घेण्याची ताकद वारकरी संप्रदायातील संत प्रभावळीने आम्हाला दिली असल्याचे मत प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालय येथील ‘प्राध्यापक प्रबोधिनी’तर्फे स्व. शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मार्ट हॉल येथे ८ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.‘प्रबोधन चळवळीतील संत साहित्याचे योगदान’ या विषयावर बोलतांना प्रा. पाटील पुढे म्हणाले की, मनुवादी व विषमतावादी व्यवस्थे विरुद्ध बंड करून समताधिष्ठित वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे नामदेव व ज्ञानेश्वर यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. तसेच उत्तर काळात संत तुकोबाराय यांना सुद्धा रात्रंदिन युद्धाच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले. कठीण परिस्थितीतही प्रबोधनाचा दीप संतांनी विझू न देता कीर्तनाच्या रंगी नाचून ज्ञानदीप जगी लावलेत. संत म्हणजे केवळ पोशाखाचे व कर्मकांडाचे स्तोम माजवणे नसून रंजल्या गांजल्याची सेवा करून माणसात देवत्व पाहणे होय. संतांचे कार्य हे चमत्काराच्या स्वरूपात न स्वीकारता तर्काच्या पातळीवर ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ या नुसार स्वीकारावे असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते संजीव सोनवणे, उपप्राचार्य एम.बी. हांडे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य डॉ.के.एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.