शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

समर स्पेशल सुविधा एक्सप्रेसचे चाक नांदगावजवळ तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 16:28 IST

०२०६२ बरौनी-लोकमान्य टिळक टर्मिनस समर स्पेशलचे नांदगाव स्थानकाजवळ मागील एसी डब्याचे चाक तुटल्याने व चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे तीन तास मुंबई रूळावरची वाहतूक ठप्प  झाली होती.

ठळक मुद्देचालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळलातीन तास रेल्वे वाहतूक ठप्पभुसावळसह विविध स्थानकांवर प्रवासी खोळंबले

भुसावळ, जि.जळगाव : गाडी क्रमांक ०२०६२ बरौनी-लोकमान्य टिळक टर्मिनस समर स्पेशलचे नांदगाव स्थानकाजवळ मागील एसी डब्याचे चाक तुटल्याने व चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे तीन तास मुंबई रूळावरची वाहतूक ठप्प  झाली होती.समर स्पेशल बरौनी-लोकमान्य तिलक टर्मिनस सुविधा एक्सप्रेस या गाडीचा पिंपरखेड-नांदगाव दरम्यान खांबा क्रमांक २८६/६ जवळ मागील एसी डब्याचे चाक तुटल्यामुळे व चालकाच्या वेळीच लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.सकाळी आठ वाजेच्या सुमारास नांदगाव अवघ्या एका किलोमीटरच्या अंतरावर असताना ही घटना घडली. डबा क्रमांक १६१२२चा चाक अचानक तुटला. शेवटून दुसरा डबा असल्यामुळे गार्ड डबा व अपघात ग्रस्त डबा जागेवरच वेगळे करून दीड तासानंतर गाडी मुंबईकडे धावली. नंतर अपघातग्रस्त दोन्ही डब्यांना तीन तासानंतर ताशी १५ किलोमीटरच्या वेगाने मशिनरीद्वारा नांदगाव यार्डात आणावे लागले.दरम्यान, या घटनेमुळे मुंबई रुळावरच्या अनेक प्रवासी गाड्यांना तीन ते चार तास उशिराने तत्काळ जागेवरच उभे राहावे लागले. यात भुसावळ, भादली, अकोला, मलकापूर याठिकाणी गाड्यांना उभे करावे लागले. गाडी क्रमांक १२१४१ पाटलीपुत्र-मुंबई, गाडी क्रमांक १२२९४, गाडी क्रमांक ११०६० गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदान एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२२२२ हावडा-पुणे दुरंतो एक्सप्रेस यासह गाडी क्रमांक ५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर अनेक गाड्या उशिराने धावल्या.दरम्यान, नवीन एलएचबी कोचच्या चाकांना तडे जाणे, उष्णतेने चाक लाल होणे, चाक तुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे.घटनेची माहिती मिळताच भुसावळ येथून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ