जळगाव : सुमारे ३५ लाखांची कर वसुली ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात न जमा करता परस्पर खर्च केल्याचा ठपका ठेवत साकेगाव ता. भुसावळ येथील ग्रामविकास अधिकारी गौतम आधार वाडे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी निलंबित केले आहे.
२ डिसेंबरला याबाबत आदेश काढण्यात आले असून ते गुरूवारी प्राप्त झाले आहेत. वाडे यांच्या निलंबन कालावधीत त्यांना एरंडोल पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे. तक्रारीनंतर सप्टेंबर महिन्यात याबाबत चौकशी करण्यात आली होती. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.