शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्यथा सोयगाव-शेंदुर्णी रस्त्याची कथा ठरली प्रसूतीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 17:01 IST

खराब रस्त्यामुळे जळगाव ऐवजी शेंदुर्णीतील प्राथमिक रुग्णालयात केले उपचार

ठळक मुद्देप्रसूतीसाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात जाण्याचा दिला सल्लाग्रामीण रुग्णालयात झाले नाही ते प्राथमिक आरोग्य केंद्रात झाले.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अधिक धोका नको म्हणून शेंदुर्णीत झाली प्रसूती

दीपक जाधव /आॅनलाईन लोकमतशेंदुर्णी, ता.जामनेर, दि.१९ : राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिला. मात्र सोयगाव ते शेंदुर्णी या रस्त्याची दुरवस्था काही केल्या कमी झाली नाही. त्यातच प्रसूती वेदनांनी विव्हळणाºया विवाहितेला पुढील उपचारासाठी जळगाव येथे जाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. मात्र रस्त्यातील खड्डयांमुळे रस्त्यातच प्रसुती नको म्हणून नातेवाईकांनी शेंदुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्याचे धाडस दाखविले. या घटनेमुळे सोयगाव-शेंदुर्णी रस्त्याची व्यथा एका प्रसूतीची कथा ठरल्याचा अनुभव एका दाम्पत्याला आला.

सोयगाव तालुक्यातील वाडी येथील रहिवासी जाकीर खाँ गनिखाँ यांची पत्नी शमिनाबी जाकीर खॉ यांना १८ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. गावात बस नाही किंवा खाजगी गाडी नाही. त्यातच त्यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन केला आणि तत्काळ रुग्णवाहिका मदतीला धावली. वाडी गावातून रुग्णवाहीकेने ग्रामीण रूग्णालय सोयगाव येथे रुग्णाला आणले. याठिकाणी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन सपकाळ यांनी औषधोपचार सुरु केले. मात्र त्यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. रुग्णासह कुटुंबातील सदस्य, आरोग्य सेविका लक्ष्मी पवार, तालुका समुह संघटक अजय डोंगरे रुग्णवाहिकेसह जळगावला जाण्यासाठी निघाले.

रस्त्याचा विकास अडला २ जिवांवर नडलासोयगाव ग्रामीण रुग्णालयातून निघालेली रुग्णवाहिका शेंदुर्णी पर्यंतच्या ७ किलोमिटरचा रस्ता चांगला नसल्याने रुग्णासह सर्वांनी जीव मुठीत धरत शेंदुर्णीत प्रवेश केला. प्रसूतीच्या वेदना पाहता अजय डोंगरे यांनी शेंदुर्णी प्रा.आ. केंद्रात दाखविण्याचे ठरविले. त्यानुसार शेंदुर्णी प्रा.आ.केंद्रातील पर्यवेक्षीका जयश्री पाटील व परिचारीका शोभा घाटे यांनी प्रसूतीची तयारी सुरु केली. प्रसूतीची पाचवी खेप असलेल्या शामिनाबी यांना मुलगा झाला. यापूर्वी त्यांना ३ मुली व एक मुलगा असे अपत्य आहे.

ग्रामीण रुग्णालयात झाले नाही ते प्राथमिक आरोग्य केंद्रात झाले.प्रा.आ.केंद्र शेंदुर्णी येथे प्रसूतीसाठी रुग्ण आले, तेव्हा रात्रीचे ९ वाजून ४० मिनिटे झालेली होती. प्रसूती नैसर्गिक व सुखरूप झाली. मुलाचे वजन २ किलो ९०० ग्रॅम आहे. प्रसूतीनंतर पर्यवेक्षीका जयश्री पाटील यांनी रुग्ण व नातेवाईकाला रात्री थांबण्याचा सल्ला दिला.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेर