आॅनलाईन लोकमत न्यूज नेटवर्कपाचोरा,दि.४ : तालुक्यातील भातखंडे बुद्रुक येथील सरपंचाच्या घरातून पाचोरा पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी अवैध दारूचा साठा जप्त करण्यात केला. पोलिसांनी सरपंचपतीस तात्काळ अटक केली आहे.या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार ३ रोजी सायंकाळी पोलीस उपअधीक्षक केशव पातोंड यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, उपनिरीक्षक सिध्दार्थ खरे व पो कॉ राहुल सोनवणे, विजय पाटील, किरण पाटील, अजय मालचे, महिला पोलीस भावसार यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने भातखंडे गावी सरपंच रेखा गणेश वाघ यांच्या घरी अचानक धाड टाकली. या कारवाईत सुमारे १० हजार रुपये किमतीच्या देशी व विदेशी अशा ५७, बॉटल मिळून आल्या. पोलिसांनी आरोपी गणेश वामन वाघ (२९) यास मुद्देमालासह अटक केली आहे. सरपंच रेखा वाघ व गणेश वाघ या दोघांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंचाच्या घरातच अवैधरित्या दारूचा साठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
भातखंडे येथे सरपंचाच्या घरून अवैध दारू साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:06 IST
पाचोरा तालुक्यातील भातखंडे बुद्रुक येथील सरपंचाच्या घरातून पाचोरा पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी अवैध दारूचा साठा जप्त करण्यात केला.
भातखंडे येथे सरपंचाच्या घरून अवैध दारू साठा जप्त
ठळक मुद्देपाचोरा पोलिसांची कारवाईसरपंचाच्या घरात आढळला १० हजारांचा दारूसाठासरपंचासह पतीविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल