शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
6
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
7
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
8
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
9
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
10
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
11
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
12
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
13
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
14
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
15
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
16
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
17
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
18
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
19
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
20
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

'साथ जियेंगे साथ मरेंगे'ची अमळनेरमध्ये आली प्रचिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 11:52 IST

मात्र कोरोनामुळे पती-पत्नीवर वेगवेगळ्या ठिकाणी झाले अंत्यसंस्कार

संजय पाटीलअमळनेर : वृद्धापकाळ आला की पती-पत्नी एकमेकांना आधार बनतात. त्यांच्या जीवनात ते इतके एकजीव झालेले असतात की अशावेळी ते काही काळ जरी एकमेकांपासून दूर गेले तरी शरीरातून निघणारे तरंग सुखदुःखाची जाणीव करून देतात. अशाच एका घटनेचा प्रत्यय शहरातील पैलाड भागात आला. पतीला हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू होताच अवघ्या अर्ध्या तासात लांब अंतरावर असलेल्या पत्नीनेही आपले प्राण सोडल्याची घटना १७ रोजी घडली.    शहरातील पैलाड भागातील सेवानिवृत्त शिक्षक पुंडलिक बाबुराव मोरे (७३) याना १७ रोजी सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा शिक्षक असलेला मुलगा एम.पी.मोरे याने त्यांना खाजगी दवाखान्यात नेले. तोपर्यंत सकाळी सात वाजता त्यांचा मृत्यू झालेला होता. तिकडे  पुंडलिक मोरे यांच्या पत्नी दमोताबाई या लग्नानिमित्त  आपल्या जावयाकडे चाळीसगाव येथे गेलेल्या होत्या. दोघे पती पत्नीचे एकमेकांवर भरपूर प्रेम होते. दोघे एकजीव झालेले होते. गेल्या ७ तारखेपासून दमोताबाई घरापासून लांब गेल्या होत्या. त्यांना घराची ओढ लागली होती. सकाळी घाई गडबडीत त्या अमळनेरला येण्यासाठी निघाल्या.  त्यांना पतीच्या घटनेची सूतरामही कल्पना नव्हती. जावई त्यांना अमळनेर येथे आणत असताना त्यांना दुःखद प्रसंगाचे जणू काही संकेत मिळाले होते. भ्रमणध्वनीप्रमाणे तरंगलहरी त्यांच्यापर्यंत पोहचल्या असाव्यात आणि काहीही त्रास नसलेल्या दमोताबाईनी साडेसात वाजेला गाडीत बसल्याबरोबर आपले प्राण सोडले.प्रेमात एकजीव झालेल्या या  पती पत्नीने सोबत प्राण सोडले, मात्र कोरोना तेथेही आडवा आला. त्यामुळे काळजी म्हणून डॉक्टरांनी दमोताबाईंचे प्रेत अमलनेरला आणू देण्यास नकार दिल्याने त्यांचे अंत्यसंस्कार चाळीसगाव येथे, तर पुंडलिक मोरे यांच्यावर  अमळनेरात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर