चोपडा, जि.जळगाव : चहाचे थकीत बील न भरल्याने ग्रामविकास अधिकाºयाची खुर्ची उचलून नेल्याची घटना चहार्डी, ता.चोपडा येथे शुक्रवारी येथे घडली.चहार्डी येथील ग्रामपंचायतीकडे झाडवण चौकात असलेल्या भरत पाटील यांच्या चहाच्या दुकानावरून गेल्या तीन-चार वर्षांपासून चहा पुरवठा केला होता. मात्र ग्रामपंचायतीने तीन-चार वर्षांपासून चहाचे सर्व बिल थकीत केले होते. त्यासाठी एकूण बिल जवळपास बारा हजार रुपये झाले होते. २१ सप्टेंबर रोजी भरत पाटील यांनी रीतसर येथील ग्राम विकास अधिकारी सुनील महाजन यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज नोंदवून माझे आपल्याकडील घेणे १२ हजार रुपये तत्काळ द्यावेत अन्यथा मी आपल्या कार्यालयातील खुर्च्या उचलून नेईन, असा इशारा दिलेला होता, मात्र आठ दिवस झाल्यानंतरही ग्रामविकास अधिकारी सुनील महाजन यांनी चहाचे बिल न दिल्याने २७ रोजी सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायतीतून चहा विक्रेता भरत पाटील यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्या कार्यालयातील त्यांची खुर्ची उचलून हॉटेलमध्ये नेली. गेल्या तीन वर्षांपासून चहार्डी ग्रामपंचायतीत चार पाच महिन्यात ग्रामविकास अधिकारी सातत्याने बदलत असल्याने भरत पाटील यांच्या बिलाची जबाबदारी एकही ग्रामविकास अधिकारी घेत नव्हते म्हणून हा पर्याय अवलंबावा लागला, असेही भरत पाटील यांनी सांगितले. तासाभरानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी भरत पाटील यांच्या विनवण्या केल्या आणि ३१ पर्यंत आपले पैसे देण्याचा प्रयत्न मी करीन, असे आश्वासन दिल्यानंतर पाटील यांनी खुर्ची परत कार्यालयात पोहचवली.या घटनेने मात्र मध्यवर्ती असलेल्या झाडवण चौकातील चहाच्या दुकानावर खुर्ची उचलून आनल्यानंतर बघ्यांची गर्दी झालेली होती. ग्रामपंचायतीची बिल न दिल्याने मोठी नामुष्की ओढवली आहे.दरम्यान, ग्रामविकास अधिकारी सुनील महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सोमवारी ग्रामपंचायतीत मासिक सभा आहे. त्यादिवशी आपण हजर राहावे. तुमच्या बिलाच्या देण्याबाबत विषय घेऊन निर्णय लावला जाईल. बिलापोटी खुर्ची उचलून नेली होती, असेही त्यांनी सांगितले.
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील ग्रामविकास अधिकाऱ्याची खुर्ची चहा दुकानदाराने उचलून नेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:59 IST
चहाचे थकीत बील न भरल्याने ग्रामविकास अधिकाºयाची खुर्ची उचलून नेल्याची घटना चहार्डी, ता.चोपडा येथे शुक्रवारी येथे घडली.
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील ग्रामविकास अधिकाऱ्याची खुर्ची चहा दुकानदाराने उचलून नेली
ठळक मुद्दे१२ हजार रुपये चहाचे बील थकीत चहार्डी येथे बिलापोटी आश्वासनानंतर खुर्ची केली परत