शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

आरटीओ-विभाग नियंत्रकात कलगीतुरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 17:43 IST

एस.टी.बसेसचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या कारणावरुन जळगावमध्ये सध्या डेप्युटी आरटीओ जयंत पाटील व एस.टी.चे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. एरव्ही नेहमीच राजकारणात रंगणारा कलगीतुरा सरकारी अधिका-यांमध्येही रंगू लागल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

ठळक मुद्देविश्लेषणएकाच बापाचे दोन लेकरे दोन्ही अधिकारी जिल्ह्याचे प्रमुख आहेत

सुनील पाटील जळगाव : एस.टी.बसेसचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या कारणावरुन जळगावमध्ये सध्या डेप्युटी आरटीओ जयंत पाटील व एस.टी.चे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. एरव्ही नेहमीच राजकारणात रंगणारा कलगीतुरा सरकारी अधिका-यांमध्येही रंगू लागल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. दोन्ही अधिकारी एकाच विभागाचे मात्र उपभाग असलेल्या विभागाचे जिल्ह्याचे प्रमुख आहेत. यानिमित्ताने दोन्ही विभागांमध्ये काय चालते याची माहिती न सांगता जनतेला मिळू लागली आहे. जिल्ह्यात अवैध वाहतूक करणा-या वाहनधारकांकडून आरटीओ हप्ते घेतात, हे खुद्द एस.टी.चे विभाग प्रमुख सांगतात, तर अवैध प्रवाशी वाहतुक करणारे वाहन जप्त केल्यानंतर एस.टी.आवारात लावण्यास एस.टी.च्या अधिका-यांनी विरोध केला, त्यामुळे अवैध वाहतुक कोणाला हवी व कोणाला नको यावरुन स्पष्ट होत असल्याचे जयंत पाटील यांचे म्हणणे आहे. दोघांच्या आरोपात किती तथ्य आहे  व वस्तुस्थिती काय आहे हे दोघांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. दुसरा मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो, तो म्हणजे अवैध प्रवाशी वाहतूक करणारे जप्त केलेल्या वाहनांना जागा न दिल्यानेच आरटीओंनी कारवाईचा बडगा उगारला हा आरोप होत आहे, याचा अर्थ असाही होतो की, यापूर्वी एस.टी.च्या बसेसला काही नियमांमधून वगळले जात असावे किंवा त्याकडे कानाडोळ केला जात असावा. एस.टी.असो की अन्य खासगी प्रवाशी वाहतूक करणारे वाहन हे व्यावसायिक असल्याने दोघांना नियम सारखाच लागू आहे, मग डोळेझाक कशी केली जाते? असा प्रश्न उपस्थित होतो. एकाच बापाचे दोन लेकरे असल्याने आपसातील उणेदुणे काढू नका अशा शब्दात पालकत्वाची भूमिका निभावणाºया परिवहन मंत्र्यांनी दोन्ही अधिका-यांना समज दिली आहे. यानिमित्ताने दोन्ही विभागातील चुकीच्या बाबी प्रकर्षाने जनतेसमोर आल्या आहेत. आपल्या विभागात भ्रष्टाचार नाही असे दोघांपैकी एकही अधिकारी छातीठोकपणे सांगू शकत नाही. त्यामुळे संयम बाळगणे हेच दोघांसाठी अधिक फायद्याचे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव