शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध आरपीएफची मोहीम तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 17:55 IST

आठ लाख ६२ हजार १९१ किमतीची ४७९ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देभुसावळ विभागात ४४ दलालांना पकडलेआठ लाखांची तिकिटे जप्त

भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांच्या काळाबाजाराचा धोका रोखण्यासाठी दलालांविरूद्ध मोहीम तीव्र केली आहे. लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधी दरम्यानच्या छाप्यांमध्ये सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले. आठ लाख ६२ हजार १९१ किमतीची ४७९ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली.रेल्वेने १२ मेपासून १५ जोड्या वातानुकूलित विशेष गाड्या सुरू केल्या आणि त्यानंतर १ जून २ रोजी निवडक विशेष मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या १०० जोड्यांची घोषणा केली. अनेक वैयक्तिक आयडी वापरुन ई-तिकिटे काढण्याची आणि या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित जागा (बर्थ) बळकावण्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या होत्या.दलालांविरूद्धच्या या मोहिमेत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सायबर सेल व इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांवरील वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषत: खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात छापे टाकले. लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधी दरम्यानच्या या छाप्यांत सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले आणि आठ लाख ६२ हजार १९१ किमतीची ४७९ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली.आतापर्यंत या लॉकडाऊन व अनलॉकच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने मुंबई विभागात २२ दलाल पकडले व त्यांच्याकडून सहा लाख नऊ हजार २९८ किमतीची ३२८ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याविरूद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याव्यतिरिक्त या कोविड-१९ साथीच्या काळात रेल्वेच्या सामाजिक जाणिवेच्या प्रत्येक बाबीमध्ये मध्य रेल्वे आरपीएफची टीम अग्रभागी कोरोना योद्धा म्हणून उभी राहिली आहे. रेल्वे मालमत्तेचे रक्षण, रेल्वेच्या आवारात आणि प्लॅटफॉर्मवर श्रमिकांच्या प्रवेशाचे नियमन आणि लॉकडाऊन दरम्यान अडकलेल्या प्रवाशांना अन्न पॅकेटचे वितरण त्यांनी केले. लहान मुलांची सुटका करून त्यांच्या कुटुंंबियांशी पुन्हा भेट घालून देण्यासाठी, श्रमिक विशेष गाडीत ज्येष्ठ नागरिकांना किंवा अपंग प्रवाशांना ट्रेनमध्ये बसण्यास मदत करण्यासाठी, गर्भवती महिलांना वेळेवर वैद्यकीय सहाय्य करण्यासह ट्रेनमध्ये बसण्यास मदत केली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी सहकाऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण मास्कही त्यांनी तयार केले. गुन्हेगारांवर नजर ठेवून अंमली पदार्थ, ट्रेनमध्ये चोरलेले मोबाइल फोन इत्यादी जप्त करण्याचे काम ते चोखपणे करीत आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ