शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

चोरवड सीमा तपासणी नाका हटविण्यासाठी रस्तारोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 19:16 IST

चोरवड सीमा तपाणी नाका हटविण्यात यावा या मागणीसाठी शनिवारी कार्यकर्त्यांनी रस्तारोको आंदोलन केले.

ठळक मुद्देराज्य महामार्गावर एक तास वाहतूक ठप्परुग्णवाहिकांना दिली मोकळीक

रावेर, जि.जळगाव : चोरवड सीमा तपाणी नाका हटविण्यात यावा या मागणीसाठी शनिवारी कार्यकर्त्यांनी रस्तारोको आंदोलन केले. यामुळे बºहाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर एक तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, आंदोलकांनी रुग्णवाहिकांना मात्र वाट मोकळी करून दिली.चोरवड मध्यप्रदेश सीमा तपासणी नाक्यावरील मोटार वाहन निरीक्षक अहिरे यांनी चोरवड येथील तीन तरुणांवर दाखल केलेले दोन गुन्हे मागे घ्यावे, प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोरखधंदा चालवण्यासाठी तरूणांना हाताशी धरून त्यांच्या आयुष्याची बरबादी करत व पुन्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याने खानापूर टोल नाक्यावर उभारण्यात आलेल्या आॅनलाईन सीमा तपासणी नाक्यावर स्थलांतरीत करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले.जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य राजेश वानखेडे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष राजू सवर्णे, पं.स.सदस्य दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली, खरेदी विक्री संघाचे संचालक किशोर पाटील, सचिन पाटील, निळे निशाणचे कार्यकर्ते उमेश गाढे महेश तायडे, अटवाडे सरपंच गणेश महाजन, उपसरपंच कांतीलाल पाटील, निरूळ येथील माजी उपसरपंच जितेंद्र पाटील, जगन चौधरी, पाडळे बुद्रूकचे उपसरपंच फकिरा तडवी, थेरोळा येथील माजी उपसरपंच महेंद्र पाटील, माजी सरपंच गणेश चौधरी, राहुल महाजन आदींनी राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.जळगाव सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लि कंपनीचे उत्तर विभागाचे महाव्यवस्थापक सुरेंद्र गेडाम यांच्याशी समन्वय साधून व तपासणी नाके स्थलांतरित करण्याचा त्यांना ना हरकत दाखला देवून स्थलांतरित करण्याची कार्यवाही करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी उपप्रादेशिक परिवहन वसुली अधिकारी चंद्रशेखर इंगळे, मोटार वाहन निरीक्षक सुनील गुरव, सचिन बुडव, खानापूर महसूल मंडळाधिकारी प्रदीप आडे उपस्थित होते. फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, फौजदार सुनील कदम, मनोज वाघमारे, उत्तम शिंदे, साहेबराव पाटील, रावेर पोलीस बळ व दंगा नियंत्रण पथक व होमगार्ड असा बंदोबस्त तैनात केला होता.

टॅग्स :agitationआंदोलनRaverरावेर