शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जीगरच्या नाशिक येथून आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 12:57 IST

गोळीबार प्रकरण

ठळक मुद्देअरबाजला पाच दिवस पोलीस कोठडी

जळगाव : माजी नगरसेवक संतोष मोतीलाल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात फरार असलेला जीगर उर्फ भूषण रमेश बोंडारे (रा.उमाळा, ता.जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे अडीच वाजता नाशिक येथून  ताब्यात घेतले. दरम्यान, या गुन्ह्यात अटकेत असलेला अरबाज दाऊद पिंजारी (रा.हरविठ्ठल नगर, जळगाव) याला न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.सोमवारी सकाळी दहा वाजता सावखेडा शिवारातील आर्यन पार्क भागात संतोष पाटील यांच्यावर  गोळीबार झाला होता. प्रत्युत्तरात त्यांनी रिव्हॉल्वर काढल्याने पाटील बालंबाल बचावले. गुन्हा घडल्याच्याच दिवशी सायंकाळी संशयित अरबाज हा सायंकाळी पोलिसात हजर झाला होता. तर जीगर बोंडारे हा फरार झाला होता. जीगर याच्या शोधार्थ पोलिसांची सहा पथके कार्यरत होती. तो नाशिक येथे बहिणीच्या दिराकडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने नाशिकला रवाना झाले. पहाटे अडीच वाजता घरात झोपलेला असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दुपारी तीन वाजता त्याला शहरात आणण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली चौकशीअपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी व सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी त्याची चौकशी केली. या गुन्ह्यात आपण नव्हतोच, असे तो चौकशीत सांगत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात जीगरचा मित्र म्हणून  ओळख असलेल्या एका निलंबित पोलिसालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.दोन महिन्यापासून पाठलागसंतोष पाटील यांचा हत्येचा कट दोन महिन्यापासून रचण्यात आला होता. तेव्हापासून दोन जण पाटील यांच्या मागावर होते. पाटील हे दररोज कारनेच शेतात जायचे, ३१ डिसेंबरलाच ते दुचाकीने गेले. त्याची माहिती मिळताच अरबाज व जीगर यांनी त्यांचा पाठलाग केला आणि शेताच्याजवळच त्यांच्यावर हल्ला केल्याचे अरबाज याने पोलीस तपासात सांगितले आहे.मागे बसलेल्या जीगरने केला गोळीबारतपासाधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी अरबाज पिंजारी याला न्या.डी.बी.साठे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आपण दुचाकी चालवत असताना मागे बसलेल्या जीगर याने संतोष पाटील यांच्यावर गोळीबार केला असे अरबाज याने चौकशी सांगितले आहे. तसेच हटकर परिवारासोबत केव्हा व कुठे कट रचला याची चौकशी करावयची असल्याचे सांगून वकीलांनी पोलीस कोठडीची विनंती केली. सरकारतर्फे अ‍ॅड.रंजना पाटील यांनी काम पाहिले. या प्रकरणात बुधा दला हटकर, कैलास बुधा हटकर, आनंदा बुधा हटकर, लखन नारायण हटकर, राहूल सुरेश हटकर व ईश्वर तायडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल असून त्यांना अद्याप अटक झालेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी