शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 20:06 IST

सहाय्यक लेखाधिकारी बालंबाल बचावले

ठळक मुद्देअनेक ठिकाणी लागली गळतीआठवडाभरातील दुसरी घटना

जळगाव : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे २१ रोजी जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये असलेल्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील लेखा अधिकाऱ्यांच्या दालनामधील छताचा (स्लॅब) काही भाग अचानक कोसळला. सुदैवाने सहाय्यक लेखाधिकारी एन.ओ.पाटील हे घटनेच्या पाच मिनीटांपूर्वीच तेथून उठून बाहेर गेल्याने ते थोडक्यात बचावले. दरम्यान, आठवडाभरातील ही दुसरी घटना असून जि.प अध्यक्षांच्या निवासस्थानातील स्लॅबदेखील कोसळल्याने अध्यक्षा थोडक्यात बचावला होता.शहरासह जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने त्याचा परिणाम जुन्या इमारतींवर होत असल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारे जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत दुसºया मजल्यावर सर्व शिक्षा अभियान विभागात मंगळवारी कर्मचारी काम करीत असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लेखा अधिकारी एन.ओ.पाटील यांच्या दालनातील छताचा काही भाग टेबल, खुर्चीवर कोसळला. त्यामुळे घाबरलेल्या कर्मचाºयांनी कार्यालयाबाहेर धाव घेतली. सुदैवाने एन.ओ.पाटील हे पाच मिनिटापूर्वीच तेथून बाहेर पडले होते. मोठा आवाज झाल्याने सर्व कर्मचारी भयभीत झाले होते.अनेक ठिकाणी गळतीजुन्या इमारतीमध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे गळती लागली असून या विभागात पाण्यामुळे फाईलीदेखील भिजल्या आहे. दरवर्षी डागडुजी केली जात असली तरी छतातून पाण्याची गळती होत असल्याने कर्मचाºयांना पावसाळ््यात काम करणे धोकादयक ठरत आहे.गेल्या आठवड्यातच जि.प अध्यक्षांच्या निवासस्थानीदेखील छताचा काही भाग कोसळला होता. त्यात अध्यक्षा उज्ज्वला पाटील थोडक्यात बचावल्या होत्या. शासकीय इमारतींची दुरूस्ती करण्याती मागणी होत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव