शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात लग्नाच्या वरातीवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:57 IST

घरुन निघालेली वरात मंगल कार्यालयात जात असताना तांबापुरातील बिलाल चौकात या वरातीत प्रार्थनास्थळात थांबलेल्या काही तरुणांनी दगडफेक केल्याने पळापळ झाली.

ठळक मुद्देतांबापूरात तणावाची स्थितीएक बालक जखमी, घरांवरही दगडफेकसौम्य लाठीचार्ज; दोघांना अटक

जळगाव : घरुन निघालेली वरात मंगल कार्यालयात जात असताना तांबापुरातील बिलाल चौकात या वरातीत प्रार्थनास्थळात थांबलेल्या काही तरुणांनी दगडफेक केल्याने पळापळ झाली. घटनेनंतर प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी गंभीर घटना टळली. दरम्यान, दगडफेक करणाऱ्यांपैकी दोघांचे नाव निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी गैर्दी झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.दरम्यान, पोलिसांनी राबविलेल्या शोध मोहिमेत दगडफेक करणारा इरफान खान रहिम खान (वय १९, रा.महादेव मंदिर, तांबापुरा, जळगाव), नदीम शहा शकूर शहा (वय २०, रा. बिसमिल्ला चौक, तांबापुरा, जळगाव) व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. इरफान व नदीम याला अटक करण्यात आली.मेहरुणमधील दत्त नगरातील रहिवाशी तथा मुंबई पोलीस दलात नोकरीला असलेल्या रोहित संजय गडकर या तरुणाचे मंगळवारी लग्न होते. दुपारी एक वाजता महादेव मंदिराजवळून वरात वाजत गाजत निघून महामार्गावरील लाडवंजारी मंगल कार्यालयात जात असताना ही वरात दीड वाजता बिलाल चौकातील प्रार्थना स्थळाजवळ आली. त्यावेळी काही तरुणांनी या वरातीत अचानक जोरदार दगड व विटांचा मारा सुरु केला, त्यामुळे सर्वत्र पळापळ होऊन गोंधळ उडाला. या दगडफेकीत एका बालकाला दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, जितेंद्र राजपूत, सचिन पाटील व अशोक सनगत यांनी दगडफेक करणाºया तिघांना ताब्यात घेतले.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी