शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक वादातून नंदगाव फेसर्डी येथे दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 22:07 IST

ग्रामपंचायत निवडणूक वादातून नंदगाव फेसर्डी, ता.जळगाव येथे दोन गटात गुरुवारी सकाळी वाद होऊन दंगल उसळली.

ठळक मुद्देपोलिसांनी घेतले १२ जणांना ताब्यातमाजी सरपंचासह दोन्ही गटाचे ९ जण जखमीपाच जण खासगी तर चार जर जिल्हा रुग्णालयात

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १ : ग्रामपंचायत निवडणूक वादातून नंदगाव फेसर्डी, ता.जळगाव येथे दोन गटात गुरुवारी सकाळी वाद होऊन दंगल उसळली. कुºहाड, लोखंडी रॉड व लाठ्या-काठ्यांचा वापर झाल्याने यात दोन्ही गटाचे नऊ जण जखमी झाले आहेत. त्यात मावळत्या सरपंचाचाही समावेश आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या बारा जणांना ताब्यात घेतले असून गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.नंदगाव फेसर्डी येथे दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्याचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यात गेल्या २० वर्षापासून सरपंच असलेले शांताराम चंद्रकांत सोनवणे (वय ६०) यांचा भूषण गुणवंतराव पवार यांनी पराभव केला. यावेळी सरपंच पदाची थेट निवड होती. भूषण पवार हे लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाले. सोनवणे गटाचा पराभव झाला. निकाल लागल्यानंतर सायंकाळी सोनवणे व पवार गटात अंतर्गत धूसफूस झाली होती, मात्र तो वाद जागेवर मिटला होता.एका गटाचा पराभव तर दुसºया गटाचा विजय झाल्याने दोन्ही गटात बुधवारी सायंकाळी वाद झाल्यानंतर हा वाद गुरुवारी सकाळी नऊ वाजता पुन्हा उफाळून आला. गावातील मुख्य चौक व शाळा परिसरात दोन्ही गटाचे लोक समोरासमोर आल्याने शाब्दीक वाद व त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यामुळे दोन्ही गटाचे २० ते २५ जण एकमेकाच्या अंगावर चालून आले. डोक्यात लाठ्या, काठ्या तसेच लोखंडी रॉड टाकण्यात आले. एकाने तर घरातून कुºहाड आणून दोन तीन जणांवर हल्ला केला. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण तयार झाले.या घटनेतील माजी सरपंच शांताराम चंद्रकांत सोनवणे, त्यांचा मुलगा भाऊसाहेब शांताराम सोनवणे (वय २७), स्वप्नील शांताराम सोनवणे (वय २४), ज्ञानेश्वर वासुदेव सोनवणे व विकास गोकुळ सोनवणे यांना खासगी रुग्णांलयात दाखल करण्यात आले आहे तर प्रतिस्पर्धी गटाचे रामनाथ पंडित पाटील, राजेंद्र आधार पाटील, पिंटू पुजाराम पाटील व विरेंद्र पांडूरंग पाटील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी राजेंद्र पाटील यांना जास्त मार लागल्याने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा