शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोलीतील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी रोहित्राचे सर्व्हेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:34 IST

शिरसोली : अतिदाबामुळे शिरसोली येथील रोहित्र गेल्या चार दिवसांपासून न बसल्याने शिरसोलीतील काही भाग अंधारात होता. त्यानंतर वीज कंपनीने ...

शिरसोली : अतिदाबामुळे शिरसोली येथील रोहित्र गेल्या चार दिवसांपासून न बसल्याने शिरसोलीतील काही भाग अंधारात होता. त्यानंतर वीज कंपनीने या समस्येच्या कायमस्वरूपी निवारणासाठी नवे रोहित्र मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार शनिवारी तीन ठिकाणच्या जागांची पाहणीदेखील करण्यात आली.शिरसोली प्र.न.येथील चिंचपुरा, पाटीलवाडा, वाणी गल्ली या भागात विज पुरवठा करण्यासाठी पाचोरा रस्त्यावर स्वतंत्र रोहित्र बसविण्यात आले आहे. मात्र या रोहित्रावर अतिरिक्त दाब असल्याने या महिन्याभरात तीन वेळा रोहित्र जळाले आहे. गुरुवारी सकाळी हे रोहित्र निकामी झाल्यानंतर या भागातील नागरिक तब्बल तीन दिवस अंधारात होते. यामुळे नागरिकांमध्ये संतप्त भावना होती. यासंदभार्तील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते.वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता सुलक्षणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, प्रणय सोनवणे यांनी या रोहित्रावरील भार कमी करण्यासाठी स्वतंत्र रोहित्र तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार आमदार निधीतून या कामासाठी निधी मंजूर करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या. शनिवारी सकाळी वीज कंपनीचे अधिकारी व ग्रा.पं.सदस्यांनी तीन ठिकाणी रोहित्रासाठी जागांची पाहणी केली. त्यानुसार पाटीलवाडा, विठ्ठल मंदिर परिसर व अन्य एका ठिकाणी रोहित्राच्या जागेसाठी पाहणी करण्यात आली. या दरम्यान विठ्ठल मंदिर परिसरात नवीन रोहित्र बसविण्यासाठी सर्वसम्मती झाली.येत्या महिनाभरात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नवीन रोहित्र बसविण्यात येणार असल्याचे वीज कंपनीचे अभियंता सुलक्षणे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलतांना सांगितले.विठ्ठल मंदिर परिसरात नवीन रोहित्र बसविल्यानंतर या भागातील टॉवर व पिठाच्या गिरणीचा लोड या नवीन रोहित्रावर टाकण्यात येणार आहे. तसेच चिंचपुरा व उर्वरित भागाचा लोड हा पाचोरा रस्त्यावरील रोहित्रावर कायम ठेवण्यात येणार आहे.आकडेधारकांविरूद्ध मोहिमया भागात आकडेधारकांची संख्या जास्त असल्याने त्याचा अतिरिक्त दाब निर्माण होऊन रोहित्र वारंवार निकामी होत असते. त्यामुळे आकडे टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांची होती. त्यानुसार वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आकडेधारकांविरूद्ध मोहिम राबविली. मात्र आधीच वीज गायब असतांना ही मोहिम राबविणाºया वीज कंपनीच्या पथकाला नागरिकांच्या संतापाला समोरे जावे लागले.लोकप्रतिनिधींबद्दल नागरिकांचा रोषरोहित्राअभावी तब्बल तीन ते चार दिवस नागरिकांना अंधारात रहावे लागल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना होत्या. या दरम्यान ग्रा.पं.सदस्य अनिल पाटील व प्रणय सोनवणे वगळता वीज नसलेल्या वॉडार्तील ग्रा.पं.सदस्य व अन्य लोकप्रतिनिधींनी या प्रकरणी साधे ढुंकूनही न पाहिल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव