मुक्ताईनगरातून रोहिनी खडसे या भाजप उमेदवार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 04:54 PM2019-10-03T16:54:12+5:302019-10-03T16:54:24+5:30

शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या मुहूर्तावर रोहिणी खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Rohini Khadse, the BJP candidate from Muktinagar? | मुक्ताईनगरातून रोहिनी खडसे या भाजप उमेदवार ?

मुक्ताईनगरातून रोहिनी खडसे या भाजप उमेदवार ?

Next


मुक्ताईनगरातून रोहिनी खडसे या भाजप उमेदवार ?
मुक्ताईनगर : अखेर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचा उमदवारीबाबतचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असून खडसें ऐवजी त्यांची कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे या मुक्ताईनगर येथून भाजपच्या उमेदवार राहतील यास विश्वसनीय सूत्रांनी दुजोरा दिला आहे.
या निर्णया बाबत गुरुवारी महत्वाचे पदाधिकारी व खासदार रक्षा खडसे, महानंद चेअरमन मंदा खडसे याच्यासह काही मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चेअंती या निर्णयाची कोंडी फुटल्याचे कळते. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या मुहूर्तावर रोहिणी खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
जामनेरात चर्चा
जामनेरात भाजपाचे नेते पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. तेथेदेखील याबाबतच चर्चा झाल्याचे सांगण्यात येत होते.

Web Title: Rohini Khadse, the BJP candidate from Muktinagar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.