जळगाव- शहरातील निलांबरी हॉटेलजवळून चोरीला गेलेला ट्रक अखेर दीड महिन्यानंतर अंबाई गावात (ता़ सिल्लोड, जि़ औरंगाबाद) एका पत्र्याच्या शेडच्या मागे लपविलेला एमआयडीसी पोलिसांना आढळून आला. तो त्यांनी ताब्यात घेतला आहे. मात्र त्या ठिकाणी कुणीही संशयित आढळून आला नाही.चालक किरण तीळवणे (रा़ नेरीदिगर, ता़ जामनेर) हा १६ जून रोजी जालना येथून सळईने भरलेला ट्रक (क्ऱएमएच़२१़डी़ ८००१) घेऊन शहरात आला होता़ ट्रकमधील माल खाली करून पुन्हा किरण हा ट्रकमध्ये माल लोड करण्यासाठी निलांबरी हॉटेलजवळील अजिंठा ट्रान्सपोर्टसमोर आला़ त्या ठिकाणी ट्रक उभा करून तो निघून गेला़ १८ जूनला सकाळी ७़३० वाजता ट्रान्सपोर्टवर आल्यावर ट्रक गायब झाल्याचे दिसून आले़ आजूबाजूच्या परिसरात पाहणी केल्यानंतर ट्रक आढळून न आल्याने चोरी झाल्याची खात्री झाली़ किरण याने त्वरित एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला़
चोरट्यांनी लांबविलेला ट्रक सापडला अंबाई गावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 16:25 IST
शहरातील निलांबरी हॉटेलजवळून चोरीला गेलेला ट्रक अखेर दीड महिन्यानंतर अंबाई गावात (ता़ सिल्लोड, जि़ औरंगाबाद) एका पत्र्याच्या शेडच्या मागे लपविलेला एमआयडीसी पोलिसांना आढळून आला.
चोरट्यांनी लांबविलेला ट्रक सापडला अंबाई गावात
ठळक मुद्देचोरीला गेलेला ट्रक दीड महिन्यानंतर सापडलाएमआयडीसी पोलिसांची कारवाईसंशयित मात्र आढळला नाही.