चाळीसगाव: औरंगाबाद रस्त्यावरील रांजणगाव शिवारात असलेल्या सचिन पेट्रोल पंपावर चौघा अज्ञातांनी कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण करुन चाळीस हजार रुपये लुटून नेले. ही घटना शहरापासूनच जवळ बुधवारी मध्यरात्री घडली. हा पंप माजी जि.प.सदस्य प्रभाकर जाधव यांचा असून ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मध्यरात्री चौघे जण मोटारसायकलवर (क्र. एपी १०/ ९९७९) आले. त्यांनी प्रथम पंपावरील कॅबिनच्या काचा लोखंडी रॉडने फोडल्या. कर्मचारी विलास युवाराज लोंढे, भिकन दिगंबर घोडे, दिलीप निकम यांना देखील लोखंडी रॉडने मारहाण करीत ४० हजाराची रोकड लुटून नेली. यात विलास व भिकन हे दोघे कर्मचारी जखमी झाले.
चाळीसगावला पेट्रोलपंपावर लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 19:01 IST