शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात शस्त्राचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 12:58 IST

मेहरुण तलाव परिसरातील घटना

जळगाव : मेहरुण तलावाकडे फिरायला आलेल्या शुभम शरद बाविस्कर (वय २०, रा.वाल्मिक नगर, जळगाव) या विद्यार्थ्याला चौघांनी मारहाण करुन शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या जवळील १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल व एक हजार २०० रुपये रोख लुटून नेल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजता मेहरुण तलाव परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नूतन मराठा महाविद्यालयाचा विद्यार्थीयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शुभम बाविस्कर हा नूतन मराठा महाविद्यालयात बीएस.सीच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत आहे. रविवारी मित्र योगेश गोरख पाटील (रा.शिवाजी नगर, जळगाव) याला सोबत घेऊन दोन्ही जण दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.बी.४९२२) रविवारी सायंकाळी मेहरुण तलावाकडे फिरायला गेले. तेथून परत येत असताना आठ वाजता ग्रॅपीज हॉटेलसमोर योगेश यास शौच लागल्याने दोन्ही जण तेथे थांबले. तेथून शिरसोली रस्त्याकडे अंधारात शौचास बसला. त्यावेळी हिरव्या रंगाच्या दुचाकीवरुन (क्र.एम.एच.१९ डी. सी.२३३२) तीन ते चार तरुण आले. त्यापैकी एकाच्या हातात धारदार शस्त्र होते.त्याने हे शस्त्र गळ्याला लावून दोघांनी मारहाण करायला सुरुवात केली.खिशातील एक हजार २०० रुपये व मोबाईल काढून घेतला. दुसऱ्याने हे शस्त्र योगेशच्या पायाला टोचून पळ काढला.पाठलाग करुन घेतला दुचाकीचा क्रमांकखिशातील पैसे व मोबाईल घेऊन हे तरुण अंधारात पळून गेले. आरडाओरड केल्यानंतर काही लोक मदतीसाठी धावून आले, त्यांनी यातील दोघांना झोडपले, मात्र हे तरुण लोकांच्या तावडीतून निसटले. या तरुणांना त्यांचा दुचाकीने पाठलाग केला असता ते सापडले नाहीत, मात्र त्यांच्या दुचाकीचा क्रमांक (क्र. एम.एच.१९ डी.सी.२३३२) नोंद करता आला. या तरुणांनी हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून ठाणे अमलदार दिलीप पाटील यांच्याकडे हकीकत कथन केली.शुभम याच्या फिर्यादीवरुन अज्ञात तरुणांविरुध्द जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहेत. दरम्यान, मेहरुण तलाव परिसरात मारहाण व लुटीच्या घटना वाढल्या आहेत. काही महिन्यापूर्वी पिस्तुलचा धाक दाखवून एका उद्योजकाची कार लांबविण्यात आली होती. त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव