चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : तालुक्यातील साकळी येथे विधानसभा निवडणूक व गावातील दुर्गा विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर यावलपोलिसांनी ६ रोजी संपूर्ण गावातून पथसंचलन केले.यावेळी या पथसंचलनात फैजपूर येथील पोलीस उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे, यावलचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्यासह पोलीस फौजफाटा तसेच सुरक्षा दलातील कर्मचारी, होमगार्ड कर्मचारी सहभागी झाले होते. हे पथसंचलन गावातील मुख्य मार्गाने काढण्यात आले.विधानसभा निवडणूक व देवी विसर्जन मिरवणूक तसेच सणासुदीच्या काळात गावात कोणतिही अप्रिय घटना घडू नये आणि गुन्हेगारीवर वचक बसावा या दृष्टीने या पथसंचलनाला महत्त्व आहे.दरम्यान, ५ रोजी सायंकाळी अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनीसुद्धा गावास भेट देऊन गावातील मुख्य चौक, परिसराची व परिस्थितीची माहिती जाणून घेतली. तसेच दुर्गा विसर्जन मार्गाची पाहणी केली. त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी उपस्थित होते.
साकळी येथे पोलिसांतर्फे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 17:18 IST
साकळी येथे पोलिसांनी संपूर्ण गावातून पथसंचलन केले.
साकळी येथे पोलिसांतर्फे पथसंचलन
ठळक मुद्देगावातील मुख्य मार्गावरून केले पथसंचलनअपर पोलीस अधीक्षकांची गावास भेटदुर्गादेवी विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी