शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव परिसरात नदी - नाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 13:36 IST

बुधवारी पहाटे डोंगरी व तितूर या नद्यांना मोठा पूर आला.वाघडू, वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव येथे गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे.

ठळक मुद्देशहरात बाजारपेठेतही शिरले पाणी, पशुधनाचे नुकसान.

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : शहर व ग्रामीण भागात मंगळवार पासून सुरु झालेल्या पावसाची संततधार कायम राहिल्याने बुधवारी पहाटे डोंगरी व तितूर या नद्यांना मोठा पूर आला. शहराच्या  दक्षिणेला असणाऱ्या वाघडू, वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव येथे गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे.

मध्यरात्री व पहाटे पूर आल्याने पशुधनाचे नुकसान झाले असून जनावरे दगावली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी सकाळी सहा वाजताच महसुल प्रशासनाला नुकसानीसह परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सुचना केल्या आहे. तहसिलदार अमोल मोरे हेही स्थितीचा आढावा घेत आहे.

तालुक्यातील १४ मध्यम जल प्रकल्पांपैकी १० धरणे ओव्हरफ्लो झाले आहे. शहरात बामोशी बाबा दर्गाह परिसरासह, मुख्य बाजार पेठ, दोस्त टाॕकीज परिसर जलमय झाला असून शिवाजी घाट परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तितूर नदीलाही पूर आल्याने घाट रोडवरील जुन्या पुलावरुन पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गत २४ तासात ५४६ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक १४५ मिमी पाऊस तळेगाव मंडळात त्याखालोखाल चाळीसगाव मंडळात ९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

मन्याड धरणातूनही पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदी - नाले दूथडी भरुन वाहू लागल्याने गिरणा नदीही वाहू लागली आहे. सकाळपासून जामदा बंधाऱ्यावरुन १५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दुपारनंतर पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गिरणा पाटबंधारे विभागाने नदीकाठालगतच्या रहिवाश्यांना सर्तकतेच्या सुचना दिल्या आहे. दरम्यान या पावसामुळे पीकांचे कोणतेही नुकसान होणार नाही. अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.चाळीसगावला तुफान पाऊस...डोंगरी व तितूर नदीला पूर...पाणी शिरले मुख्य बाजारपेठेत....पाटणादेवी रोड लगतचा बामोशी बाबा दर्गाह परिसर...जलमय...डोंगरी नदीला  मोठा पूर...सर्तक राहण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचे आवाहन...कोदगाव धरण भरल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु.. पाटणादेवी येथील नदी नाले तुंडुब भरुन वाहु लागले, राञभर मुसळधार पाऊस..

वाघडू वाकडी गावात नदीचे पाणी शिरले गुरे म्हशी वाहून गेले.

चाळीसगावला तितूर नदीलाही पूर...पुराचे पाणी...डॉ. पुर्णपात्रे हाॕस्पीटल पर्यंत...

रोकडे, ता. चाळीसगाव येथे म्हशी वाहून मेल्या.

मजरे गावातही पाणी शिरले.

वाघडू नदी पुलावरून पाणी चाळीसगाव ते नागद चाळीसगाव जाणारा मार्ग संपर्क तुटला.

गणेशपूर तितूर नदीला सकाळी दोन वाजता पूर चितेगाव धरण १००% भरण्याची शक्यता.

कन्नड घाटातही ठिकठिकाणी भूस्सखलन... वाहतूक ठप्प...

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावfloodपूरRainपाऊस