शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपसा बंद असताना नदी पात्रांना ओरबडणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 13:02 IST

महसूलच्या पथकावर नजर ठेवून दिला जातो चकमा

जळगाव : वाळू ठेके बंद होऊन उपशावर बंदी असतानाही शहर व परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरूच असून वाळू वाहतूकदारांकडून नदी पात्र अक्षरश: ओरबडले जात आहे. सोबतच ठिकठिकाणी साठवून ठेवलेल्या वाळू साठ्यांमधूनही वाळूची चोरी होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. महसूलचे पथक नदीपात्राकडे जाऊन वाळू उपशावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यावर वाळू वाहतूकदारांची नजर असते. त्यामुळे वाळूची वाहने पथकास चकमा देऊन पसार होत असल्याचेही प्रकार सुरू आहे. मुळात खरोखर पथकाकडून कारवाई केली जाते की केवळ सोपस्कार म्हणून पाहणी होत आहे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.वाळू गटांची मुदत ३० सप्टेंबर रोजीच संपली आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याही वाळू गटातून वाळूचा उपसा करू शकत नाही. असे असले तरी दररोज मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत असल्याचे चित्र आहे. गिरणा नदीपात्रात तर वाळू उपशासाठी वाहनांची जत्राच भरल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे या ठिकाणी वाहनांच्या चाकांचे निशाण मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. त्यामुळे त्यावरूनच उपशाचा अंदाज येतो.आव्हाणे, खेडी, वडनगरी, निमखेडी, सावखेडा, बांभोरी या भागातून सर्रासपणे वाळू उपसा सुरु आहे. ही वाहतूक रात्रीच्या वेळी तर मोठ्या प्रमाणात होतेच सोबतच आता दिवसाही वाळूची वाहने वाळू भरुन नेत असल्याचे दिसून येते.शुक्रवारीदेखील गिरणा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाहने वाळू भरत होती. त्या ठिकाणी वाळू भरून-भरुन नदी पात्र अक्षरश: ओरबडले जात आहे. या खेरीज मोहाडी परिसरातही चार डंपरद्वारे बेसुमार वाळूचा उपसा केली जात असल्याची तक्रार आहे.वाळू येते कोठून?नदी पात्रातून वाळूचा उपसा तर सुरूच आहे, सोबतच निमखेडीत वाळूचा मोठा साठा प्रशासनाला आढळून आला. अशाच प्रकारे आव्हाणे परिसरातही हा साठा असल्याचे समोर आले. जर उपसा बंद आहे तर हा साठा येतो कोठून, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे वाळू साठा कोणाचा आहे, यासाठीदेखील कोणी पुढे यायला तयार नाही. त्यामुळे महसूलच्या पथकाने निमखेडी येथील २०० ब्रास वाळू जप्त केली. त्यानंतर तर एका जणाने साठवून ठेवलेली वाळू दुसऱ्यानेच पळवून नेल्याचाही प्रकार घटला. त्यामुळे वाळूचा प्रश्न किती तापत आहे, हे सर्वांना समजत असले तरीमहसूलविभागाकडून वाळूचीवाहतूककारोखलीजातनाही,याबद्दलआश्चर्यव्यक्तकेलेजातआहे.अवैध वाळू वाहतुकीने घेतले बळीअवैध वाळू उपशामुळे गेल्या वर्षी धरणगाव तालुक्यातील आव्हाणी शिवारात गिरणा नदी पात्राजवळ गुराख्याला तर शिवाजीनगरात एका बालका[ी वाळू वाहतूक करणाºया वाहनाने चिरडले होते. असे गंभीर प्रकार घडूनही अवैध वाळू वाहतूकदारांवर महसूल विभाग मेहरनजर का दाखवित आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.वाळू वाहतूकदारांवर कारवाई करण्यासाठी महसूलचे पथक असून ते वाहतुकीवर नजर ठेवून आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा मोबदला देण्याचे सध्या काम सुरू असून त्यास प्राधान्य दिले जात आहे. महसूलचे पथक कारवाईस निघताच वाळू वाहतूकदारांकडून पाठलाग सुरू असतो.- वैशाली हिंगे, तहसीलदार.

टॅग्स :Jalgaonजळगाव