शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चालक व त्याच्या मित्राकडून तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 21:53 IST

एकाला अटक : बलात्काराच्या गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर पुन्हा तेच कृत्य

जळगाव : शहरातील एक रिक्षा चालक व त्याच्या मित्राने १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला रिक्षातून फिरवून तिच्यावर रिक्षातच आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकाश सुरेश नागपुरे (२२, रा.अशोक किराणाजवळ, रामेश्वर कॉलनी) याला रविवारी मध्यरात्री एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याचा गणेश नावाचा साथीदार फरार झाला आहे.सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी व रिक्षा चालक गणेश तसेच त्याचा मित्र प्रकाश हे तिघं दहा वर्षापासून एकमेकांना ओळखतात. रविवारी दुपारी गणेश याने पीडित तरुणीच्या वडीलांच्या मोबाईलवर संपर्क साधून तरुणीला घराबाहेर बोलावले. एकमेकांना ओळखत असल्याने तरुणीच्या वडीलांनीही बाहेर जायला परवानगी दिली. त्यानंतर गणेश व प्रकाश या दोघांनी कुसुंबा गो शाळेत फिरायला जायचं असल्याचे सांगून रिक्षात बसवून तेथे नेले.प्रकाश हा रिक्षा चालवत होता तर गणेश व तरुणी दोघं मागे बसले होते. कुसुंबा गो शाळेत एक तास थांबल्यानंतर तिघं तेथून अयोध्या नगराकडे एका शेतात रिक्षा घेऊन गेले. दोघंही रिक्षातून उतरल्यानंतर आपसात काही तरी बोलले, त्यानंतर गणेश याने तु माझी गर्लफ्रेंड आहे, तू मला खूप आवडते, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे म्हणत रिक्षातच तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर प्रकाश याने परत यानेही जबरदस्तीने तरुणीवर अत्याचार केला. यावेळी त्याला नकार देत असताना मोठमोठ्याने तरुणीने आरडाओरड केली, मात्र जवळपास कोणीच नसल्याचे उपयोग झाला नाही. हा प्रकार झाल्यानंतर दोघांनी तरुणीला परत घरी नेऊन सोडले. घरी गेल्यावर पीडितेने झाल्याप्रकाराची माहिती आई, वडीलांना दिली.गुन्हा दाखल होताच एक फरारपीडित तरुणी व तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली, मात्र महिला अधिकारी नसल्याने तक्रारीस बराच विलंब झाला.स्थानिक गुन्हे शाखेच्या सहायक निरीक्षक नीता कायटे यांनी फिर्याद घेतल्यानंतर मध्यरात्री दीड वाजता गणेश व प्रकाश या दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला.दरम्यान, पोलिसात तक्रार दिल्याची कुणकुण लागताच गणेश हा फरार झाला तर उपनिरीक्षक विशाल वाठोरे, विशाल सोनवणे, सचिन मुंडे, गोविंदा पाटील व भूषण सोनार यांच्या पथकाने रात्री दोन वाजता प्रकाश नागपुरे याला अटक केली. सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.बलात्काराचा दुसरा गुन्हाप्रकाश नागपुरे याच्याविरुध्द याआधी देखील बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला नुकतान जामीन झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जामीनावर असताना त्याने पुन्हा तोच गुन्हा केला. आता बलात्कारासह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक विशाल वाठोरे व सचिन मुंडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव