शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

एस.पींनी घेतला ‘त्या’ पाच गुन्ह्यांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:53 IST

 तत्कालीन नगरपालिका आणि जिल्हा बॅँकेशी संबंधित गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या पाच गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश खंडपीठाने दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शनिवारी या गुन्ह्याचे तपासाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्याकडून दाखल गुन्हा व तपास याचा आढावा घेतला.

ठळक मुद्दे पाच तास बैठक  गुन्ह्याचे कागदपत्रे हस्तांतर होणार

जळगाव :  तत्कालीन नगरपालिका आणि जिल्हा बॅँकेशी संबंधित गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या पाच गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश खंडपीठाने दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शनिवारी या गुन्ह्याचे तपासाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्याकडून दाखल गुन्हा व तपास याचा आढावा घेतला.जळगाव पालिकेने राबविलेल्या वाघूर पाणीयोजना, विमानतळ विकास प्रकल्प, जिल्हा बँकेच्या आयबीपी योजना, पालिका आणि महावीर पतसंस्थेला दिलेले कर्ज या पाच  गुन्ह्यांच्या तपासावर असमाधान व्यक्त करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.टी.व्ही. नलावडे व न्या.मंगेश पाटील यांच्या पीठाने या गुन्ह्यांचा फेरतपास करण्यासाठी तीन आठवड्यात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक गुन्ह्यांचे कागदपत्रे तपासलेदरम्यान, या १८ पानी आदेशात नेमके काय म्हटले आहे व गुन्ह्याची सद्यस्थिती काय आहे याची माहिती घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी तपासाधिकारी प्रशांत बच्छाव यांना जळगावात बोलावून घेतले होते. या दोन्ही अधिकाºयांमध्ये तब्बल  पाच तास बैठक चालली. एकेक गुन्ह्याचे कागदपत्रांची पडताळणी करुन त्याची माहिती डॉ.उगले यांनी बच्छाव यांच्याकडून जाणून घेतली.नावे मागविल्यानंतर होणार समिती गठीतन्यायालयाने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिल्यानंतर खंडपीठाचे प्रबंधक रिझर्व्ह बॅँक, नाबार्ड, सहकार विभागाचे लेखापरिक्षक, गृहविभाग व शासन यांच्याकडून प्रत्येकी एका अधिकाºयाचे नाव मागवतील. तीन आठवड्याच्या आत ही नावे खंडपीठाकडे जातील. त्यानंतर समिती स्थापन होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली.  समिती गठीत झाल्यानंतर तपाधिकाºयाकडून कागदपत्रे घेण्यात फेरतपास केला जाणार आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व पोलीस अधीक्षक यांचाही या समितीत समावेश असेल.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव