शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोरोनातील ‘हॅपी हायपोक्झिया’ या घातक शारीरिक स्थितीची जनजागृती करताय ‘महसुली’ डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 14:31 IST

प्रांताधिकारी तथा कोविड आपत्ती समादेशक म्हणून सेवारत असलेले डॉ.अजित थोरबोले यांच्यातील दडलेला हाडाचा डॉक्टर खºया अर्थाने जागल्याची भूमिका समाजमनात कौतुकास्पद ठरली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकरप्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्यातील हाडाचा डॉक्टर समाजाच्या आरोग्यासाठी देतोय कडा पहारादडलेला हाडाचा डॉक्टर खऱ्या अर्थाने जागल्याची भूमिका समाजमनात कौतुकास्पद

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : अनलॉकच्या दुसºया टप्प्यात कोरोनाचा वाढता सामाजिक प्रादुर्भाव पाहता आरोग्य यंत्रणेला व समाजमनाला चकवा देत समाजमनात काही कोरोना बाधित सूप्त वाहकांंच्या ‘हॅपी हायपोक्झिया’ या अत्यंत घातकी अशा रूग्णाला बाह्यांगाने सदानंदी असलेल्या पण अंतरंगाने शरीरातील लाखो पेशी मृत पावून मरणयातना भोगण्याची गंभीर व तितकीच समाजमनाला चकवा देणाºया लक्षणांची जनजागृती डॉ.अजित थोरबोले हे करीत आहेत.समाजव्यवस्थेचे आरोग्य जोपासण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागातील नव्हे तर चक्क महसूल विभागात फैजपूर प्रांताधिकारी तथा कोविड आपत्ती समादेशक म्हणून सेवारत असलेले डॉ.अजित थोरबोले यांच्यातील दडलेला हाडाचा डॉक्टर खºया अर्थाने जागल्याची भूमिका समाजमनात कौतुकास्पद ठरली आहे.महसूल प्रशासनात आपत्ती व्यवस्थापन व शिस्त जोपासताना त्यांनी कधी मेणाहून मऊ होऊन, तर कधी वज्राहून कठीण होताना फौजदारी कारवाईदेखील केली. मात्र कोरोनाचा जसजसा प्रसार फैजपूर उपविभागीय क्षेत्रात पाय पसरू लागला तसतसा त्यांच्यातील हाडाचा डॉक्टर जागी होऊ लागला. डॉ.थोरबोले हे ‘बीएएमएस’ पदवीधारक डॉक्टर असल्याने त्यांची रुग्णसेवा उजागर होऊ लागली. म्हणून त्या अनुषंगाने कोविड केअर सेंटरला सातत्याने भेटी देत रुग्णांची आरोग्य सेवा, भोजन व चहापान, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी बाबींवर लक्ष केंद्रित करून त्यांनी रुग्णांची काळजी घेत त्यांच्याशी हितगुज साधताना सकारात्मक भावनेने अनेकदा धीरही दिला. त्यांनी आपल्या हाडातील डॉक्टर जागी ठेवत काळजीपूर्वक पावले उचलून निव्वळ तासागणिक वेतनावर आधारित कर्तव्यदक्षता नव्हे तर आपत्ती व्यवस्थापनात वैद्यकशास्त्रातील रूग्णसेवेप्रमाणे त्यांनी झोकून दिले आहे.त्यात सद्य:स्थितीत त्यांनी रावेर व यावल तालुक्यातील आरोग्य केंद्रनिहाय बैठका घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची संकल्पना मांडली. किंबहुना, कोरोना या विषाणूमुळे सामाजिक संक्रमण होत असल्याची गंभीर बाब पाहता ‘हॅपी हायपोक्झिया’ या समाजमनावर गुगली टाकणाºया शारीरिक अवस्थेवर लक्ष केंद्रित करून त्यांनी समाजजागृती करण्याचा प्रसंगावधान राखून घेतलेली भूमिका स्वागतार्ह ठरली आहे. ‘हॅपी हायपोक्झिया’ या कोरोनाच्या गुगली टाकणाºया लक्षणाबाबत त्यांनी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना लक्षणे दिसत नसल्याने तो वरकरणी अतिशय आनंदी दिसत असला तरी, त्याच्या फुफ्फुसात घर केलेल्या कोरोनाच्या विषाणूने सर्व पेशी गिळंकृत करीत आॅक्सिजन घेण्यास अडथळा निर्माण करीत असतो व शरीरातील रक्तपेशींना पूर्णपणे प्राणवायू न भेटल्याने हा रुग्ण अंतिम स्थितीत प्राणवायूअभावी मरण यातनेकडे वाटचाल करीत असतो अशी जनजागृती त्यांनी केली आहे. म्हणूनच अशा हॅपी हायपोक्झिया असलेल्या समाजातील सुप्त कोरोना वाहकांचा शोध घेण्यासाठी आॅक्सीपल्समीटरने आॅक्सीजनचे सरासरी प्रमाण मोजण्याची काळाची गरज असल्याचे प्रबोधन डॉ.थोरबोले यांनी समन्वय बैठकांमधून सातत्याने केले आहे. त्यामुळे ‘हॅपी हायपोक्झिया’ असलेल्या कोरोना बाधित रूग्णांचा तातडीने शोध घेऊन त्यांना कोरोना चाचणी व औषधोपचारासाठी तातडीने दाखल करण्याबाबत डॉ.थोरबोले यांनी सातत्याने आवाहन केले.प्रांताधिकारी वा आपत्ती व्यवस्थापन समादेशक या पदांच्या जबाबदारीखेरीज त्यांच्यातील हाडाचा डॉक्टर जागृत झाल्याने त्यांनी कोरोनाची गुगली टाकणाºया ‘हॅपी हायपोक्झिया’ या लक्षणांना समाजमनात पल्स आॅक्सीमीटरच्या माध्यमातून उघडे पाडण्यात यश साध्य केल्याने डॉ.थोरबोले या महसुलातील डॉक्टरांना समाजमनातून खºया अर्थाने सलाम केला जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यRaverरावेर