शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासिका व जलसंधारणाच्या कामासाठी निवृत्त मुख्याध्यापकाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 10:52 IST

नांद्रा : गावाच्या विकासासाठी दिली सुमारे दीड लाखांची रक्कम

- शामकांत सराफपाचोरा : शिक्षणामुळे कुटुंब आणि समाजाची प्रगती होते आणि जलसंधारणामुळे शेतीचा विकास करता येतो या उदात्त हेतूला हातभार म्हणून पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक डब्ल्यू.एस.पाटील यांनी पुढाकार घेतला. या कामाला चालना मिळावी यासाठी स्वत: दीड लाखांची रक्कम दिली आहे. पाचोरा तालुक्यातील नांद्रा या छोट्याशा गावात सेवानिवृत्ती नंतरही डब्ल्यू.एस.पाटील हे अध्यापनाचे काम करीत आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी अभ्यासिका तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांच्या या विचारांना माजी विद्यार्थ्यांनी साथ देत ५५ हजार रुपयांचा निधी जमविला. या रकमेत पाटील यांनी २१ हजारांची रक्कम टाकून अभ्यासिका तयार केली. या अभ्यासिकेत एक संगणक, परीक्षेची पुस्तके, अवांतर पुस्तके ठेवण्यात आली आहेत.

१ लाखांच्या निधीची उभारणीया अभ्यासिकेचे उद्घाटन २ मे रोजी दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांच्या हस्ते झाले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ही अभ्यासिका यशस्वीपणे सुरु राहण्यासाठी व देखभालीसाठी एक लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यांनी उपस्थित लोकांना आवाहन केले आणि तात्काळ पाटील यांनी पुन्हा एकवीस हजार दिले. माजी पोलीस, पाटील रघुनाथ सखाराम पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी ४१ हजार रुपये दिल्याने एक लाखांची रक्कम सहज जमा झाली.

जलसंधारणाच्या कामासाठी एक लाखांचा निधीसेवानिवृत्त मुख्याध्यापक डब्ल्यू.एस.पाटील यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात त्यांनी जलसंधारणाच्या कामासाठी गावास एक लाख रुपये देण्याचे ठरविले होते. त्यानुसार औरंगाबाद येथील महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान या सेवा भावी संस्थेमार्फत गावातील नदी खोली करणासाठी एक लाख रुपये लोकवर्गणी लागणार होती. या कामासाठी त्यांनी एक लाख रुपयांचा धनादेश ग्रामस्थांना दिला.

टॅग्स :Waterपाणी