शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अर्थ मंत्रालयातील काम जबाबदारीचे आणि आव्हानात्मक-सुनील चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 00:08 IST

शरदकुमार बन्सी धरणगाव , जि.जळगाव : अर्थ मंत्रालयातील आर्थिक कार्य विभाग भारत सरकारची आर्थिक धोरणे ठरविणारा असा महत्त्वाचा विभाग ...

ठळक मुद्देसंडे स्पेशल मुलाखत- चर्चेतील व्यक्तींशी थेट संवादअर्थ मंत्रालयातील उपसचिव सुनील चौधरी यांची माहिती

शरदकुमार बन्सीधरणगाव, जि.जळगाव : अर्थ मंत्रालयातील आर्थिक कार्य विभाग भारत सरकारची आर्थिक धोरणे ठरविणारा असा महत्त्वाचा विभाग आहे. यात माझ्याकडे आपल्या देशाचे ‘राजकोशीय धोरण’ तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधी कार्य आहे. सोप्या भाषेत, भारत सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करणाऱ्या मुख्य टीमचा मी एक घटक आहे. कार्य राष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. यामुळे मोठ्या जबाबदारीचे आणि आव्हानात्मक तर आहेच, पण त्यासोबत समाधान देणारेही असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयातील उपसचिव सुनील भागवत चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.त्यांची १ जून रोजी आर्थिक कार्य विभागात उपसचिव म्हणून निवड झाली. झुरखेडा, ता.धरणगाव येथील ते मूळ रहिवासी आहेत. यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : या पदावर निवड कशी झाली?पदवी मिळवल्यानंतर पुण्यात खासगी कंपनीत दोन वर्ष काम केले. पुढे भारतीय स्टेट बँकेत पुणे, औरंगाबाद, मुंबई येथे चार वर्षे प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नोकरी केली. २००८ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालो. केंद्र सरकारमध्ये इंडियन सिव्हिल अकौंटस सर्व्हिस (आय.सी.ए.एस.) या वित्तीय प्रबंधन संबंधित कार्य करणाºया सेवेत निवड झाली. यामुळे सुरुवातीपासून नवी दिल्ली येथे नियुक्ती आहे.प्रश्न : आतापर्यंत कोणत्या जबाबदाºया पार पाडल्या?आतापर्यंत केंद्र सरकारच्या शहर विकास मंत्रालय, अर्थ मंत्रालय, रसायन आणि खते मंत्रालय या ठिकाणी वेगवेगळ्या जबाबदाºया हाताळल्या आहेत.प्रश्न : यू.पी.एस.सी. परिस्थिती उत्तीर्ण होण्यासाठी काय प्रयत्न केले?ठरवलेल्या ध्येयापासून विचलीत न होता, अभ्यासात सातत्य ठेवले. स्टेट बँकेत नोकरी करीत असतानाच यू.पी.एस.सी.चा अभ्यास सुरू केला. यशस्वी झालेल्या तरुणांच्या अनुभव कथनातून शिकत गेलो आणि स्वत:ला मोटिव्हेट करत गेलो.प्रश्न : तुमचा आदर्श कोण आहे?प्रामाणिक तथा जबाबदारीने आपली कर्तव्ये करणारी प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही क्षेत्रातील आणि कोणत्याही स्तरावरील असो, ती माझ्यासाठी आदर्शवत आहे.प्रश्न : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया तरुणाईला काय सांगणार?केवळ स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे नव्हे तर सर्वच तरुणांना सांगायला मला आवडेल की, आजचे जग हे स्पर्धात्मक आणि धावपळीचे आहे. त्यामुळे क्षेत्र कोणतेही असो, स्पर्धा ही अटळ आहे. स्पर्धा इतरांशी कमी आणि स्वत:शी जास्त करा. यातून जादा तणाव येणार नाही आणि स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून ध्येयापर्यंत जलद पोहोचता येईल. दुसरे असे की, सेल्फ मोटिव्हेशन आवश्यक आहे. त्यासाठी मनाने, विचारांनी व शरीराने सुदृढ राहा. सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता तुमच्या व्यक्तिमत्वात भिनू द्या. शेवटचे आणि अति महत्त्वाचे मेहनतीला पर्याय नाही. म्हणून या सर्व गोष्टी सोबत घेऊन, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत राहा, यश नक्की मिळेल.प्रश्न : ग्रामीण भागातून आलेला अधिकारी म्हणून अर्थ मंत्रालयात काम करतानाचा आपला अनुभव?ग्रामीण पार्श्वभूमी ही माझ्यासाठी नेहमीच जमेची बाजू राहिली आहे. ग्रामीण भागात अजूनही सोयी-सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे आपल्या ध्येय मार्गावर चालत असताना येणाºया अडचणी आणि आव्हानांवर मात करीत पुढे वाटचाल करण्याची सवय होऊन जाते. यातून आत्मविश्वासही उंचावतो. भारत सरकारच्या आर्थिक आणि इतर धोरणांचा ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून अधिक चांगला विचार करता येतो. त्यामुळे अर्थ मंत्रालयात काम करताना नक्कीच छान वाटते.प्रश्न : आपली कौटुंबिक पार्श्वभूमीजन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात. आई-वडिलांचे शालेय शिक्षण झालेले नसले तरी त्यांच्याकडे इतर अनुभवांचे शिक्षण मोठे होते. शिक्षणाचे महत्व त्यांना चांगले माहीत होते, म्हणून त्यांनी आम्हा भावंडांना शिक्षणासाठी प्रेरणा दिली. मोठे भाऊ प्राथमिक शिक्षक, तर लहान भाऊ शेती करतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. पत्नी रुपालीचे नेहमीच सहकार्य असते.

टॅग्स :interviewमुलाखतDharangaonधरणगाव