सनपुले येथे कोविड लसीकरणाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:11 IST2021-07-05T04:11:49+5:302021-07-05T04:11:49+5:30

लसीकरण केंद्रात ११४ लोकांना लसीकरण करण्यात आले. चहार्डी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वसंत जाधव आणि डॉ. महेंद्र पाटील ...

Response to covid vaccination at Sunpule | सनपुले येथे कोविड लसीकरणाला प्रतिसाद

सनपुले येथे कोविड लसीकरणाला प्रतिसाद

लसीकरण केंद्रात ११४ लोकांना लसीकरण करण्यात आले. चहार्डी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वसंत जाधव आणि डॉ. महेंद्र पाटील यांच्या विशेष सहकार्यामुळे सनपुले गावात लसीकरण पार पडले. म्हणून गावातील लोकांनी चहार्डी आरोग्य केंद्राचे विशेष आभार मानले. याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ.दीपक रघुनाथ पाटील, आरोग्यसेवक सुनील महाजन, छाया नवल धनगर, आशासेविका सरला उत्तम कोळी, रत्नज्योत गोविंदा बाविस्कर, छाया बळीराम पाटील, जयश्री रवींद्र मोरे आदींनी लसीकरण शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे सनपुले येथील सरपंच-सुनंदाबाई हिरामण पाटील, शेतकरी संघटनेचे उपजिल्हा अध्यक्ष-किरण एम. गुर्जर, हिरामण काशिराम पाटील, ग्रामविकास अधिकारी-संदीप पाटील, ग्रा. पं. शिपाई-काशिनाथ पवार, डाटा ऑपरेटर-नंदकिशोर पाटील,आदी ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले.

040721\img-20210704-wa0013.jpg

सनपुले येथे कोविड लसीकरणात लसीकरण करतांना महिला व इतर

Web Title: Response to covid vaccination at Sunpule