शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव कृउबात शेतकऱ्यांना लागू करणार हिशेबपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 11:32 IST

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर अतिरिक्त वसुलीच्या फटक्यास बसणार ‘ब्रेक’

ठळक मुद्देशेतकऱ्यांना नियमानुसार हिशेबपट्टी लागू करावी, अशी पदाधिकाऱ्यांची भूमिकामाजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी झाली बैठककाही व्यापाऱ्यांनी सहमती दर्शविली तर काहींनी मुदत मागून घेतली.

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.८ : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांना नियमानुसार हिशेबपट्टी लागू करावी, अशी ठाम भूमिका समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. यासंदर्भात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी गुरुवारी झालेल्या बैठकीत संबंधित व्यापाऱ्यांनी काही दिवसांची मुदत मागितली आहे.शेतकऱ्यांना हिशेबपट्टी लागत नसल्याने कच्ची पावती दिली जाते. यात त्यांना हमाली, आडत कमिशन आदी जादाचे पैसे मोजावे लागतात. हिशेबपट्टी लागल्यावर हे अतिरिक्त शुल्क लागणार नाही. यामुळे नवनिर्वाचित सभापती लकी टेलर यांनी हिशेबपट्टी लागू करण्याचा आग्रह धरला आहे.यासंदर्भात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या मुख्य उपस्थितीत दुपारी ४ वाजता पदाधिकारी व संचालक तसेच व्यापारी आणि शेतकरी यांची बैठक झाली. या वेळी सुरेशदादा यांनीही जे नियमानुसार आहे तेच झाले पाहिजे, याचा आग्रह धरला. यासाठी काही व्यापारी राजी झाले तर काहींनी काहीच निर्णय दिला नाही. यामुळे काही दिवसांची मुदत व्यापाऱ्यांनी मागितली आहे.लिलाव रजिस्टरमध्ये नोंद नसल्याने नुकसानमागे ९०० शेतकऱ्यांनी कांदा बाजार समितीत विकला होता. या वेळी शासनाकडून मिळणारे अनुदान मात्र ६०० शेतकऱ्यांनाच मिळाले. ३०० शेतकऱ्यांची नोंद लिलाव रजिस्टरला नसल्याने त्यांचे नुकसान झाले. यामुळेच नियमानुसारच कामे झाली पाहिजेत असा आपला आग्रह असल्याचे सभापती लकी टेलर यांनी सांगितले. बैठकीस अनिल भोळे, वसंत भालेराव, शशी बियाणी आदी संचालकांसह भाजीपाला असो. चे अध्यक्ष आत्माराम माळी, चुडामण पाटील, राजेश भाटिया, गुलाब सेठीया, कर्मचारी संघटनेचे सचिव रवी नारखेडे, प्रमोद काळे, कैलास शिंदे, वासुदेव पाटील तसेच शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव